ETV Bharat / state

..अन्यथा राष्ट्रवादीला गुद्द्यावर उत्तर दिले जाईल; आमदार पडळकरांच्या गाडीवरील हल्ल्याचे पंढरपुरात पडसाद

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर 30 जूनला सोलापुरात दगडफेक करण्यात आली. यानंतर भाजप आक्रमक झाली आहे.

bjp pandharpur
निवेदन देताना भाजपचे कार्यकर्ते
author img

By

Published : Jul 1, 2021, 5:46 PM IST

Updated : Jul 1, 2021, 9:31 PM IST

पंढरपूर - राष्ट्रवादीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या घोंगडी बैठकीला मिळणारा प्रतिसाद पाहवत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीने मुद्द्याची गोष्ट गुद्द्यावर आणली आहे. इथून पुढे जर राष्ट्रवादीकडून मुद्द्याची गोष्ट गुद्द्यावर आणली तर राज्यातील बहुजन समाजाकडून राष्ट्रवादीला गुद्द्याने उत्तर दिले जाईल, असा इशारा सोलापूर जिल्हा भाजप उपाध्यक्ष सुभाष म्हस्के यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.

प्रतिक्रिया देताना जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रा. सुभाष म्हस्के

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्याचे पंढरपुरात पडसाद-

सोलापूर शहरात 30 जून रोजी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली होती. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजप व धनगर समाजाच्यावतीने पंढरपूर येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना निवेदन देत वाहनावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला तातडीने अटक करून शिक्षा करावी, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली आहे.

पंढरपुरात भाजप राष्ट्रवादीविरोधात आक्रमक-

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर 30 जूनला सोलापुरात दगडफेक करण्यात आली. यानंतर भाजप आक्रमक झाली असून, या घटनेचा पंढरपुरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Jul 1, 2021, 9:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.