वीजबिलात सवलतीसाठी महावितरण कार्यालयासमोर भाजपकडून वीजबिलांची होळी - भाजपकडून वीजबिलांची होळी
वाढीव वीजबिलात जनतेला रास्त सवलत द्यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष अक्कलकोट तालुका यांच्या वतीने सोमवारी सकाळी अक्कलकोट येथे आंदोलन करण्यात आले.
सोलापूर- महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना भरमसाठ वीज बिले पाठवली आहेत. त्या वाढीव वीजबिलात जनतेला रास्त सवलत द्यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष अक्कलकोट तालुका यांच्या वतीने सोमवारी सकाळी अक्कलकोट येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा आंदोलकांनी महावितरण कार्यालयासमोर वीज बिलाची होळी केली. हे आंदोलन भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारच्या निषेध केला-
सध्या उद्भवलेल्या भीषण परिस्थितीचा सामना करणे सर्वसामान्य लोकांना कठीण जात आहे. यातून दिलासा मिळावा यासाठी शासनाने लक्ष घालून वीज बिलात सवलत द्यावी, अशी आग्रही मागणी भाजपाने लावून धरली आहे. या आंदोलकांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला. तसेच घोषणाबाजी करून मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सोलापूर शहरात आचारसंहितामुळे आंदोलन रद्द
पदवीधर व शिक्षक निवडणुकीमुळे शहरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा सभा संमेलने घेण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. या कारणास्तव सोलापूर शहरात राज्यव्यापी भाजप आंदोलन सोलापूर शहरात झाले नाही. यावेळी झालेल्या आंदोलनात आमदार सचिन कल्याणशेट्टी, अक्कलकोट तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, अक्कलकोट शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, प्रभाकर मजगे, अप्पासाहेब पाटील, राजेंद्र बंदीछोडे, खय्युम पिरजादे, गुंडप्पा पोमाजी, भीमाशंकर इंगळे, चंद्रकांत इंगळे, यासह भाजप कार्यकर्ते व युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.