ETV Bharat / state

सुभाष देशमुखांनी माढ्यातून निवडणूक लढवू नये, भाजप कार्यकर्त्यांची मागणी

author img

By

Published : Mar 17, 2019, 9:18 PM IST

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये अशी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली असून यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास ३० सरपंचांनी राजीनामा अस्त्र उगारले आहे.

सुभाष देशमुख आणि भाजप कार्यकर्ते

सोलापूर - सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू नये, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. यासाठी दक्षिण सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामाअस्त्र उगारले आहे.

Subhash Deshmukh & BJP Activist
सुभाष देशमुख आणि भाजप कार्यकर्ते

सध्या आपल्या नेत्याला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी आंदोलने करणे, पक्षश्रेष्ठींकडे निवेदन देऊन आपलाच नेता कसा योग्य आहे हे दाखवण्याची सगळीकडे स्पर्धा लागलेली आहे. असे असताना सोलापुरात मात्र नेमके उलटे चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहू नये, अशी मागणी सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

माढ्यातून लोकसभा लढवू नये यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास ३० सरपंचांनी राजीनामा अस्त्र उगारले आहे. तर शहरातील भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे देण्याची तयारी दाखवली आहे. सुभाष देशमुख हे राज्य पातळीवरील नेतृत्त्व असल्याने त्यांना पक्षातीलच काही असंतुष्टांकडून जाणीवपूर्वक दिल्लीला पाठविण्याचा घाट घातला जात आहे. शिवाय देशमुखांनी दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामेही केली आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभा लढविण्याचीच तयारी करावी, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Intro:R_MH_SOL_01_17_MADHA_SUBHASH_DESHMUKH_CONTRO_S_PAWAR

कार्यकर्त्यांची अजब मागणी, सुभाष देशमुखांनी माढ्यातून उभे राहू नये यासाठी राजीनामा अस्त्र,
सोलापूर-
आपल्या नेत्याला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी आंदोलन निवेदन देऊन पक्षश्रेष्ठीकडे आपलाच नेता लोकसभेसाठी किती चांगला आहे हे दाखवण्याची सगळीकडे स्पर्धा लागलेली असताना सोलापुरात मात्र नेमके त्याच्या उलट चित्र पाहायला मिळत आहे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हाडा लोकसभेसाठी निवडणुकीला उभे राहू नये अशी मागणी सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे माढ्यातून लोकसभा लढवू नये यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास तीस सरपंचांनी राजीनामा अस्त्र उगारले आहे तर शहरातील भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे देण्याची तयारी दाखविली आहे.

Body:माढा लोकसभेसाठी भाजपकडून सुभाष देशमुख यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे सुभाष देशमुख यांची माढातून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर देशमुख यांनी माढा तून निवडणुकीला उभे राहू नये अशी मागणी सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुभाष देशमुख यांनी शरद पवार यांच्या विरोधात माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यावेळी सुभाष देशमुख यांच्या प्रचार यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसला सळो कि पळो करून सोडले होते खुद्द शरद पवार यांना शेवटच्या दिवसांमध्ये तब्बल पंधरा सभा घेण्याची वेळ सुभाष देशमुख यांनी आणली होती त्यामुळेच 2019 च्या निवडणुकीत देखील भाजपकडून सुभाष देशमुख यांना माढा ची उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे .
असे असले तरीही मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सुभाष देशमुख दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आणि राज्याच्या सहकार मंत्री पदाची सूत्रे स्वीकारली राज्यात कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे केली असून मागील वर्षानुवर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघांमध्ये भाजपच्या देशमुख यांनी काम करत कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक निधी आणण्याचे काम सुभाष देशमुख यांनी केले असल्यामुळे देशमुखांनी माढ्यातून निवडणूक न लढवता दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी कायम राहावे या मागणीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास तीस सरपंचांनी राजीनामा देण्याची ची तयारी दाखवली आहे दक्षिण सोलापूर तालुका भाजपचे अध्यक्ष राम पाचवड शेट्टी यांच्याकडे राजीनामे दिले आहेत सरपंच सोबतच सोलापूर शहरातील भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सुभाष देशमुख यांनी माढ्यातून निवडणूक लढवू नये यासाठी राजीनामे द्यायची तयारी दाखवली आहे.

राज्यात सगळीकडे उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात असताना सोलापुरात मात्र सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे सुभाष देशमुख यांनी माढ्यातून लढू नये यासाठी कार्यकर्ते पुढे सरसावले असून देशमुख यांच्या संपर्क कार्यालय समोर आंदोलनही करण्याची भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

Conclusion:बाईट - धर्मा राठोड,ब सरपंच हतूर
बाईट- अक्षय अंजिखाने, भाजपा युवा मोर्चा
बाईट- सुभाष शेजवळ, नगरसेवक, सोलापूर महापालिका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.