सोलापूर Sushilkumar Shinde On BJP : पत्रकार दिनाच्या निमित्ताने सोलापूर श्रमिक पत्रकार संघात वार्षिक कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी माध्यमांना माहिती देताना सुशीलकुमार शिंदेंनी (Sushilkumar Shinde) भाजपावर बोचरी टीका केलीय. 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा संपन्न (Ayodhya Ram Mandir) होणार आहे. प्रभू रामचंद्रबाबत देशात भाजपा पक्ष स्वतःच हक्क सांगत आहे का? असा प्रश्न विचारला असता शिंदेंनी भाजपावर टीका केली.
स्वत प्रभू राम त्यांना हक्क घेऊ देणार नाही : सुशीलकुमार शिंदेंनी यावेळी सांगितलं की, प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र प्रभू राम यांवर फक्त भाजपावाल्यांचा हक्क नाही सर्वांचा हक्क आहे. प्रभू श्रीराम स्वतः त्यांना सर्व हक्क घेऊ देणार नाहीत.
पत्रकारितेच्या बाबतीत जनताच वेळ बदलेल : दरवर्षी बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) यांचा जन्मदिवस पत्रकार दिवस साजरा केला जातो. शनिवारी 6 जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेनी पत्रकारांना मार्गदर्शन केलं. भारत स्वातंत्र्य होण्या अगोदर पत्रकारिता वेगळी होती आणि आजची पत्रकारिता वेगळी आहे. सत्ताधारी पक्षाकडून पत्रकारांच्या बाबतीत त्यांचे मोबाईल हॅक केले जाताता, पण हे सर्व काही काळापूरतंच चालतं. जनता हे सर्व जास्त दिवस चालू देणार नाही, असं माहिती सुशीलकुमार शिंदेंनी दिलीय.
22 जानेवारीला लोकार्पण सोहळा : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या सर्वांनाच लागलीय. त्यातच हा सोहळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. येत्या 17 जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. 22 जानेवारी रोजी मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
हेही वाचा -