ETV Bharat / state

'वडिलांच्या स्मरणार्थ भिंगारे कुटुंबीयांकडून 250 परिवाराला मदत'

शहरापासून जवळच असलेल्या तळेहिप्परगा या गावात खाणकामगार आणि रोजंदार कामगारांच्या 250 कुटुंबीयांना भिंगारे परिवारे अन्नधान्याची मदत केली.

वाटप करताना
वाटप करताना
author img

By

Published : Apr 8, 2020, 6:35 PM IST

Updated : Apr 8, 2020, 8:19 PM IST

सोलापूर - शहरापासून जवळच असलेल्या तळेहिप्परगा या गावात खाणकामगार आणि रोजंदार मजुरी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. खाणकामगार आणि मजुरांना अन्नधान्याची कमतरता पडू नये यासाठी तळे हिप्परगा येथील भिंगारे कुटुंबीयांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ अडीचशे कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप केले.

'वडिलांच्या स्मरणार्थ भिंगारे कुटुंबीयांकडून 250 परिवाराला मदत'

लॉकडाऊन झाल्यानंतर शहरात कामाला गेलेले अनेक कुटुंब हे परत गावात परत आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून आपले गाव सोडून गेलेले कामगार हे गावाकडे परतले असल्यामुळे गावात आल्यावर त्यांची मोठी अडचण झालेली आहे. तसेच गावातील काम करणारे देखील हाताला काम नसल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तळे हिप्परगा येथील भिंगारे कुटुंबीयांनी कामगारांची ही अडचण लक्षात घेऊन गावातील अडीचशे पेक्षा जास्त कामगारांना अन्नधान्याच्या किटची वाटप केले. तळे हिप्परगा गावात खाणकामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच मजूरी करणारे देखील जास्त आहे. अशा कुटुंबाची संख्या ही पाचशेपेक्षा जास्त आहे. पहिल्या टप्प्यात भिंगारे परिवाराने अडीचशे कुटुंबाना अन्नधान्याची मदत केली आहे.

तळे हिप्परगा येथील दिवंगत लक्ष्मणराव भिंगारे यांच्या स्मरनार्थ खाणकामगार, कष्टकरी मजूर अशा जवळपास अडीचशे कुटुंबांना अन्नधान्याच्या कीटचे वाटप केले आहे. वडिलांच्या स्मरणार्थ कुमार भिंगारे, रोहन भिंगारे व सचिन भिंगारे यांनी पुढाकार घेऊन तळे हिप्परगा येथील अडीचशे कुटुंबांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत अडीचशे कुटुंबांना दोन दिवसात जीवनावश्यक साहित्य दिले जाणार आहे.

हेही वाचा - कहर कोरोनाचा: पपईची संपूर्ण बाग जाग्यावर सडली, शेतकऱ्याला लाखोंचा फटका

Last Updated : Apr 8, 2020, 8:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.