ETV Bharat / state

Factory Election : कोण मारणार भीमाची बाजी; भीमा सहकारी कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात

सोलापूर मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ( Bhima Cooperative Sugar Factory ) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Siddheshwar Cooperative Sugar Factory ) काडादी मंगल कार्यालयात जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे (District Deputy Registrar Kundan Bhole ) यांच्या निरीक्षणात ही मतमोजणी सुरू झाली आहे.

Factory Election
भीमा सहकारी कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात
author img

By

Published : Nov 14, 2022, 11:59 AM IST

सोलापूर : सोलापूर मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ( Bhima Cooperative Sugar Factory ) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रविवारी झाली. आज सकाळ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ( Siddheshwar Cooperative Sugar Factory ) काडादी मंगल कार्यालयात जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे ( District Deputy Registrar Kundan Bhole ) यांच्या निरीक्षणात ही मतमोजणी सुरू झाली आहे. खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे उमेश पाटील, प्रशांत परिचारक,अभिजित पाटील हे निवडणूक मैदानात आहेत. या निवडणूकसाठी 15 संचालकांसाठी 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. रविवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. भीमा सहकारी कारखान्यातील 78.86 टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

भीमा सहकारी कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात

भीमाची बाजी कोण मारणार : सोलापूर येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कादडी मंगल कार्यालयात भीमा सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सोमवारी सकाळी सुरू झाली आहे. भीमा सहकारी कारखान्याचे सध्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या विरोधात भिमा बचाव परिवर्तन पॅनलकडून माजी आमदार राजन पाटील यांनी ताकद लावली आहे.भीमाची सत्ता कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भीमाच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्याचे राजकारण अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. भाजप व राष्ट्रवादीचे नेते या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. स्वपक्षातील नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.

भीमाच्या निवडणूकित भाजप व राष्ट्रवादीतील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकित भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे उमेश पाटील, भाजप सहयोगी माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील,भाजप आमदार समाधान अवताडे, विठ्ठलचे कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, माजी उपसभापती तानाजी माने, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर, चंद्रभागा साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे,जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.