सोलापूर - बँक ऑफ इंडियाने कोरोनाच्या संकटात शासन आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात पुढे केला आहे. सोलापूर विभागातील बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी गरजू आणि गरीब नागरिकांसाठी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुंची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहे. बँक ऑफ इंडिया सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू यांनी सांगितले.
सध्या जगभरात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे देशात संपूर्णपणे संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. सोलापूरमध्येही सर्व उद्योग-व्यवसाय बंद आहेत. त्या उद्योग-व्यवसायांतील गरीब कामगार, मजूर, कष्टकऱ्यांना अन्नधान्याची कमतरता जाणवत आहे. याचीच जाणीव ठेवून बँक ऑफ इंडियाने सोलापूर विभागातील सर्व शाखांमधून फूड पॅकेट वाटप करण्याचा निर्णय घेतला.
नागरीकांना आवश्यक असलेला किराणा, हात आणि कपडे धुण्याचे साबण यांचे पॅकेट तयार करुन सोलापूर 500, पंढरपूर 100, लातूर 100, नांदेड 100, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे देण्यात आले.