ETV Bharat / state

Accident On Pandharpur Road : भाविकांच्या ट्रॅक्टरला अपघात; चारजण जागीच ठार, तर 6 गंभीर जखमी - पंढरपूर रोडवर अपघात बातमी

सोलापूर पुणे महामार्गावर लांबोटी जवळ ट्रॅक्टरमध्ये पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीतील भाविकांवर काळाने घाला घातला. ट्रकने या ट्राक्टरला जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर सुमारे एक हजार फुट फरफटत गेला. यामध्ये चारजण जागीच ठार झाले आहेत. तर सुमारे 6 भाविक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. (Accident on the way to Pandharpur) ही घटना रविवारी (दि. 13 मार्च)रोजी रविवारी 9 वाजता कोंडी-केगाव मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ घडली. दरम्यान यातील जखमींना सालापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पंढरपूर मार्गावर अपघात
पंढरपूर मार्गावर अपघात
author img

By

Published : Mar 14, 2022, 6:52 AM IST

Updated : Mar 14, 2022, 8:34 AM IST

सोलापूर - सोलापूर पुणे महामार्गावर लांबोटी जवळ ट्रॅक्टरमध्ये पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीतील भाविकांवर काळाने घाला घातला. ट्रकने या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर सुमारे एक हजार फुट फरफटत गेला. (tractor accident on the way to Pandharpur) यामध्ये चार वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, 6 जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 13 मार्च)रोजी रविवारी 9 वाजता कोंडी-केगाव मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ घडली. दरम्यान यातील जखमींना सालापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

व्हिडिओ

ट्रकचा टायर फुटल्याने अपघात

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी माहिती देताना सांगितले की, ट्रकचा टायर फुटल्याने ड्रायव्हरचे गाडीवरी नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. हे सर्व भाविक एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी निघाले होते. यातील मृतांमध्ये १३ वर्षांच्या मुलाही समावेश आहे.

मृतांची नावे-

भागाबाई जरासन मिसाळ(वय 60), तुकाराम सुदाम शिंदे (वय २०), जरासन माधव मिसाळ (वय 60), ज्ञानेश्वर दत्तात्रय साळुंखे (वय 13) अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील रहिवासी आहेत.

जखमीची नावे-

राम शिंदे (वय ५०), मच्छिंद्र मोरे (वय ५६), आनंद मिसाळ (वय ६०), समाधान शिवाजी कदम (वय ४०), आकाश किसन गिरी (वय ६५), मंदा कदम (वय ५०), सुलभा साळुंके (वय ५०), जयश्री साळुंके (वय 40),समर्थ साळुंके (वय २५), निर्मला कदम (वय ४०), शीतल शिंदे (वय ३५), शुभम अंकुश शिंदे (वय २५), नागनाथ साळुंके (वय ४५), समर्थ साळुंके (वय १६), तानाजी थोडसरे (वय १७) आदी जखमी झाले आहेत. आणखीन जखमींची नावे व त्यांचा पत्ता शोधण्याचे कामकाज सुरू आहे.

ट्रकचालक फरार-

अपघात झाल्यानंतर ट्रक चालक आणि त्याचा सहायक घटनास्थळावरून पळून गेले. अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी हे सर्व तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व भाविक एकादशीनिमित्त ट्रॅक्टरमधून पंढरपूरला निघाले होते. सोलापूर कडून मोहोळ मार्गे पंढरपूरला जात असताना ट्रॅक्टर कोंडी ते केगावच्या दरम्यान असताना पाठीमागून ट्रकने (एम एच 12 टीव्ही 7348 जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की ट्रॅक्टर सुमारे एक हजार फूट फरफटत गेला. या घटनेनंतर परिसारात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - मित्रासोबत फोटो काढायला गेला.. पाय घसरला अन् बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

Last Updated : Mar 14, 2022, 8:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.