ETV Bharat / state

Ashadhi wari २०२१ : विठ्ठल मंदिर एकादशी सोहळ्यासाठी सज्ज, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून होणार विठ्ठलाची महापूजा - uddhav thackeray

लाखों वारकऱ्यांचा आराध्य दैवत असणार्‍या सावळ्या विठुरायाची आषाढी एकादशी सोहळा २० जुलैला होणार आहे. या एकादशी सोहळ्याची तयारी विठ्ठल मंदिर समितीकडून पूर्ण झाली आहे.

Ashadhi wari 2021 : Pandharpur Ashadhi Ekadashi vitthal rukhmini mahapooja Preparations complete
Ashadhi wari २०२१ : विठ्ठल मंदिर एकादशी सोहळ्यासाठी सज्ज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून विठ्ठलाची महापूजा
author img

By

Published : Jul 18, 2021, 12:21 AM IST

Updated : Jul 18, 2021, 6:19 AM IST

पंढरपूर - लाखों वारकऱ्यांचा आराध्य दैवत असणार्‍या सावळ्या विठुरायाची आषाढी एकादशी सोहळा २० जुलैला होणार आहे. या एकादशी सोहळ्याची तयारी विठ्ठल मंदिर समितीकडून पूर्ण झाली आहे. यामध्ये मंदिरातील सोळखांबी, सभा मंडप, विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाभारा कर्मचाऱ्यांकडून चकाचक करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची तयारी करण्यात आल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

अधिक माहिती देताना विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी

कोरोना पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून योग्य ती दक्षता
गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पांडुरंगाची आषाढी एकादशी प्रातिनिधिक स्वरूपाचा होणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिर प्रशासनाकडून मंदिरातील स्वच्छतेची योग्य ती दक्षता घेताना दिसत आहे. दिवसभरातून मंदिरातील कर्मचारी हे तीन वेळा मंदिर स्वच्छ करतात. यामध्ये सॅनिटायझरची फवारणी असेल. यावर मंदिर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदीच्या उजळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामासाठी १२ कर्मचारी काम करत आहेत.

मानाच्या पालख्यांमधील वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था

राज्य सरकारने संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या सह दहा मानाच्या पालख्यांना एकादशी दिवशी पंढरपुरात येण्याची परवानगी दिली आहे. १९ जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एसटीच्या माध्यमातून या पालख्या वाखरीत तळावर येणार आहेत. त्या ठिकाणी विठ्ठल मंदिर प्रशासनाकडून त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही केली असल्याची माहिती विठ्ठल जोशी यांनी दिली.

मुख्यमंत्री ठाकरे सपत्नीक करणार विठ्ठलाची महापूजा

आषाढी यात्रा दरवर्षी आषाढ शुध्द एकादशी या दिवशी भरते. २० जुलै रोजी पहाटे २ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान, मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक श्रीची शासकीय महापूजा केली जाणार आहे. मुख्यमंत्री यांच्या सोबत श्रीच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी म्हणून श्री विठ्ठल मंदिरातील वीणेकरी केशव शिवदास कोलते (वय ७१) आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई केशव कोलते (वय ६६, रा. संत तुकाराम मठ, नवनाथ मंदिर पाठीमागे, वर्धा) यांना मिळणार आहे.

हेही वाचा - Ashadhi wari : पंढरीत रविवारपासून सात दिवसाची संचारबंदी लागू, पोलिसांकडून सात ठिकाणी नाकाबंदी

हेही वाचा - वीस वर्षांपासून विठ्ठलाची मनोभावे केली सेवा, मुख्यमंत्र्यांसोबत महापुजेचा मिळाला मान

Last Updated : Jul 18, 2021, 6:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.