पंढरपूर - विठू माऊलीच्या दर्शनाला, आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील मानाच्या पालख्या निवडक वारकरी बंधूंसह एसटीने पंढरी नगरीमध्ये दाखल झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी स्वागत केले. यावेळी पोलीस प्रशासनाचा चोक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात येण्यास महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील नऊ मानाच्या पालख्यांचे परवानगी देण्यात आली होती. त्यात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी), संत तुकाराम महाराज संस्थान (देहू), संत मुक्ताबाई संस्थान (मुक्ताईनगर, जि. जळगाव), संत सोपानदेव महाराज संस्थान (सासवड), संत एकनाथ महाराज संस्थान (पैठण, जि.औरंगाबाद), संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान (त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), संत नामदेव महाराज संस्थान (पंढरपूर), विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान (कवंड्यापुर, जि. अमरावती), संत चांगावटेश्वर महाराज देवस्थान (सासवड) या पालख्या पंढरपुर येथील आपल्या मठामधे दाखल झाल्या आहेत.
पंढरपूर परिसरात नागरिकांकडून फुलाच्या वर्षाव करून दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री ही पंढरपूरात पदाखल झाले आहे. पहाटे 2.20 मिनिटला विठ्ठलाच्या महापूजेला मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढीवारी अत्यंत मोजक्या वारकरीसह या पालख्या पंढरीत आल्या आहेत.
हेही वाचा - पंढरपूर; मंदिर प्रदक्षिणा परिसरात कोरोनाचे 7 पॉझिटिव्ह रुग्ण
हेही वाचा - VIDEO : सुनीसुनी पंढरी.. लॉकडाऊनमुळे विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागेचे वाळवंट निर्मनुष्य