ETV Bharat / state

आषाढी एकादशी सोहळा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 19 जुलै रोजी पंढरीत मुक्कामी - vitthal rukmini

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 19 जुलैच्या रात्री पंढरपुरात मुक्कामी येणार आहेत. 20 जुलैच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय पूजा होणार आहे. याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

Ashadhi Ekadashi 2021 : Chief Minister Uddhav Thackeray stays in Pandharpur on July 19
आषाढी एकादशी सोहळा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 19 जुलै रोजी पंढरीत मुक्कामी
author img

By

Published : Jul 16, 2021, 2:52 AM IST

पंढरपूर - वारकऱ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 19 जुलैच्या रात्री पंढरपुरात मुक्कामी येणार आहेत. 20 जुलैच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय पूजा होणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून विठुरायाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई येथील मातोश्री निवासस्थानावर जाऊन आमंत्रण देण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 19 जुलैला पंढरीत मुक्काम
आषाढी एकादशी सोहळ्याची विठुरायाची शासकीय पूजा परंपरेने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी गुरूवारी मुंबई येथील मातोश्री येथे जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना येण्याचे खास आमंत्रण दिले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 19 जुलैच्या रात्री पंढरीत मुक्कामी येणार असल्याची माहिती दिली. 20 जुलैच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय पूजा करतील, अशी माहिती गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

विठुरायाची आषाढी वारी प्रातिनिधिक स्वरूपाची होणार
कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आषाढी पायी वारीला बंदी घातली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पांडुरंगाची आषाढी वारी प्रातिनिधिक स्वरूपाची करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला. मानाच्या दहा पालख्यांना 40 प्रमाणे 400 वारकऱ्यांना पंढरीत प्रवेश दिला जाणार आहे. त्यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाकडून नऊ दिवसाची संचारबंदी पंढरीत लागू करण्यात आली आहे. तर 19 जुलैच्या रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरीत मुक्कामी येणार आहेत. तर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. आषाढी एकादशी दिवशी पंढरीत कोणत्याही भाविकाला प्रवेश दिला जाणार नाही.

हेही वाचा - विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा नैतिक अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही - प्रवीण दरेकर

हेही वाचा - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मूळ रूप; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे निधीसाठी पाठपुरावा करणार - डॉ. नीलम गोरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.