ETV Bharat / state

लग्नात घोडा नाचवण्याचे फॅड बेतले एकाच्या जीवावर, रिक्षा चालकाचा मृत्यू

अंजनगावच्या स्टँडवर उभा असलेला रिक्षा चालक अनिल गायकवाड हादेखील नाचणारा घोडा पाहण्यासाठी गेला होता. मात्र, वाढत्या उकाड्यामुळे बघ्यांच्या गर्दीत नाचणारा घोडा अचानक बिथरला. त्याने अनिल गायकवाड यांच्या तोंडावर लाथ मारली. यामुळे गायकवाड खाली पडले. त्यानंतरही घोड्याने त्यांना लाथा मारल्याने ते जखमी झाले.

लग्नात घोडा नाचवण्याचे फॅड बेतले एकाच्या जीवावर, रिक्षाचालकाचा मृत्यू
author img

By

Published : May 30, 2019, 9:47 PM IST

सोलापूर - लग्नाच्या वरातीत नाचणारा घोडा पाहणे एका निष्पाप माणसाला महागात पडले आहे. एका लग्नसमारंभावेळी भर उन्हात नाचून बिथरलेल्या घोड्याने बघ्यांमध्ये उभ्या असलेल्या एकाचा जीव घेतला. अनिल गायकवाड (वय.36) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा या गावात ही घटना घडली आहे.

अंजनगाव खेलोबा येथे किसन वाघमोडे यांच्या मुलाचे लग्न होते. यावेळी लग्नापूर्वी घोड्यावर बसून नवरदेवाची मिरवणूक (वरदावा) गावातून काढण्यात आली. दरम्यान नवरा मुलगा दर्शनासाठी देवळात गेला. त्यावेळी मोकळा असलेल्या घोड्याला उत्साही युवकांनी नाचवायला सुरुवात केली. बेफाम नाचणारा घोडा पाहण्यासाठी वर्‍हाडी आणि वाटसरू बघ्यांनी गर्दी केली होती. यावेळी उन्हाचा कडाकाही वाढला होता.

दरम्यान, अंजनगावच्या स्टँडवर उभा असलेला रिक्षा चालक अनिल गायकवाड हादेखील नाचणारा घोडा पाहण्यासाठी गेला होता. मात्र, नाचणारा तो घोडा वाढत्या उकाड्यामुळे आणि बघ्यांच्या गर्दीमुळे अचानक बिथरला. त्याने अनिल गायकवाड यांच्या तोंडावर लाथ मारली. यामुळे गायकवाड खाली पडले. त्यानंतरही घोड्याने त्यांना लाथा मारल्याने ते जखमी झाले. त्यांना उपचारार्थ सोलापूर येथील शासकीय रुग्णालय हलविण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांचा मृत्यू झाला. मृत गायकवाड हे सामान्य कुटूंबातील होते. ते रिक्षा चालवून कुटूंबांचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या निधनाने अंजनगावावर शोककळा पसरली आहे.

लग्न समारंभात डॉल्बी, बेंजो बरोबर घोडा नाचविण्याचे मोठे फॅड आहे. काही उत्साही मंडळी तर नवरदेव घोड्यावर बसलेला असताना घोडा नाचवण्याचा अट्टाहास धरतात. कर्णकर्कश आवाज, त्यात ऊन याचा थोडाही विचार केला जात नाही. घोड्याचा तर अजिबात विचार न करता नवरदेवाची मित्रमंडळी घोडा नाचवण्यास भाग पाडत असतात. अनेक वेळा नाचणारा घोडा बिथरतो. तो पुन्हा सहजासहजी काबू करता येत नाही. अशा प्रकारामुळे अनेकजण जखमी झाल्याची उदाहरणे आहेत. अंजनगावात यामुळे एका व्यक्तीला नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं यापुढे तरी वर्‍हाडी मंडळीसह उत्साही मंडळींनी बोध घ्यावा ही माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Intro:सोलापूर :
लग्नाच्या वरदाव्यात नाचणारा घोडा पाहणं एका निष्पाप माणसाला महागात पडलंय.भर उन्हात नाचून बिथरलेल्या घोड्याने बघ्यांमध्ये असलेल्या अनिल गायकवाड या 36 वर्षीय इसमास लाथाडून ठार केलंय. ही घटना माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा येथे घडलीय.Body:माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा येथे किसन वाघमोडे यांच्या मुलाचं लग्न होतं.यावेळी लग्नापूर्वी घोड्यावर बसून नवरदेवाची मिरवणूक (वरदावा) गावातून काढण्यात आली.दरम्यान नवरा मुलगा दर्शनासाठी देवळात गेला.त्यावेळी मोकळा असलेल्या घोड्याला परण्यातील उत्साही युवकांनी नाचवायला सुरुवात केली. बेफाम नाचणारा घोडा पाहण्यासाठी वर्‍हाडी आणि वाटसरू बघ्यांची गर्दी झाली.
अंजनगावच्या स्टँडवर उभा असलेला रिक्षाचालक अनिल गायकवाड हा ही वरदावा व नाचणारा घोडा पाहण्यासाठी गेला.उष्म्याने अचानक नाचणारा घोडा अचानक बिथरला त्याने अनिल गायकवाड यांच्या तोंडावर लाथ मारली. गायकवाड खाली पडले. त्यानंतरही घोड्याने त्यांना लाथा मारल्या त्यात ते जखमी झाले.त्यांना उपचारार्थ सोलापूर येथील शासकीय रुग्णालय हलविण्यात आले.घोड्याने लाथ मारल्याने गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा त्यातच मृत्यू झाला. मयत गायकवाड हे सामान्य कुटूंबातील होते. ते रिक्षा चालवून कुटूंबांचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या निधनाने अंजनगावावर शोककळा पसरली आहे.Conclusion: लग्न समारंभात डॉल्बी,बेंजो बरोबर घोडा नाचविण्याचे मोठे फॅड आहे. काही उत्साही मंडळी तर नवरदेव घोड्यावर बसलेला असताना घोडा नाचविण्याचा अट्टाहास धरतात. कर्णकर्कश आवाज, मी म्हणणारं ऊन याचा थोडाही विचार केला जात नाही. घोड्याचा तर अजिबात विचार न करता नवरदेवाची मित्रमंडळी घोडा नाचविण्यास भाग पाडत असतात. अनेक वेळा नाचणारा घोडा बिथरतो. तो पुन्हा सहजासहजी काबू करता येत नाही. अशा प्रकारामुळे अनेकजण जखमी झाल्याची उदाहरणे आहेत.अंजनगावात तर एका घरकर्त्या माणसाला नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं यापुढे तरी वर्‍हाडी मंडळीसह उत्साही मंडळींनी बोध घ्यावा ही माफक अपेक्षा !

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.