ETV Bharat / state

पदवीधरांसाठी स्थापन करणार स्वतंत्र महामंडळ - आमदार अरुण लाड - MLA Arun Lad News

राज्यातील पदवीधर मतदारांनी आणि आमदारांनी मला संधी देत या पदवीधर मतदारसंघातून भाजपला हद्दपार केले. पदवीधरांसाठी आगामी काळात राज्य सरकारच्या माध्यमातून स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड यांनी दिली.

MLA Arun Lad visits Solapur
आमदार अरुण लाड सोलापूर दौरा
author img

By

Published : Feb 7, 2021, 7:36 PM IST

सोलापूर - राज्यातील पदवीधर मतदारांनी आणि आमदारांनी मला संधी देत या पदवीधर मतदारसंघातून भाजपला हद्दपार केले. पदवीधरांसाठी आगामी काळात राज्य सरकारच्या माध्यमातून स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड यांनी दिली.

माहिती देताना आमदार अरुण लाड

हेही वाचा - सरकारकडून मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत समजाची दिशाभूल - नरेंद्र पाटील

आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन पदवीधरांच्या प्रश्नांवर चर्चा केली आहे. महामंडळाच्या माध्यमातून पदवीधरांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, असेही लाड यांनी सांगितले. लाड आज सोलापूर दौर्‍यावर आले होते. रामलाल चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिक्षण, शेतकरी आंदोलन, आरक्षण, पदवीधर प्रश्न यासह विविध प्रश्नांवर भाष्य केले.

यापूर्वीच्या सरकारने सुशिक्षित तरुणांसाठी काहीच केले नाही

पुणे पदवीधर मतदारसंघात ५ जिल्हे आणि 58 तालुक्यांचा समावेश आहे. या मतदारसंघातील बहुतांश मतदारांनी मला पहिल्या पसंतीचे मत दिले. तर, विरोधकांना मतदानच केले नाही. पहिल्या पसंतीची मते घेऊन विजयी होणारा मी पहिलाच आमदार आहे. दरम्यान, ज्यांनी या मतदारसंघाचे बारा वर्षे प्रतिनिधित्व केले त्यांनी त्यांच्या कार्यकाळात एकदाही पदवीधर हा शब्द उच्चारला नाही. राज्यात सत्ता असतानाही त्यांनी सुशिक्षित तरुणांसाठी काहीच केले नसल्याने मला या निवडणुकीत यश मिळाल्याचे लाड यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या धोरणामुळे आगामी काळात शिक्षण महागणार

अरुण लाड यांनी केंद्र सरकारवर खरमरीत टीका केली. केंद्र सरकार किंवा मोदी सरकारच्या धोरणांमुळे शिक्षण महागणार आहे. माझ्याकडे अनेक जणांनी या धोरणाच्या तक्रारी केल्या आहेत. त्यावर महाविकास आघाडी सरकार मार्ग काढून सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त शिक्षण कसे मिळेल, याची योजना आखत असल्याची माहिती लाड यांनी दिली. पत्रकार परिषदेत आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, कार्याध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष जुबेर बागवान आदी उपस्थित होते.

आगामी काळातही महाविकास आघाडी कायम राहील

महाविकास आघाडीने एकत्रित येऊन काम केल्याचा मोठा फायदा झाला. आगामी काळातही महाविकास आघाडी कायम राहील. माझ्या मोबाईलवर सुमारे 15 हजार पदवीधरांनी त्यांचे प्रश्न मांडले असून त्याचा अभ्यास करून त्यावर मार्ग काढणार. महामंडळाच्या माध्यमातून पदवीधरांचे सर्व प्रश्न सोडविले जातील. शेतकरी हमीभावासाठी आंदोलन करत असतानाही मोदी सरकारने त्यावर मार्ग काढला नाही. शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा घाट मोदी सरकारने घातला असून आगामी काळात शिक्षण महागणार आहे. कामगार अस्वस्थ असून मोदी सरकारने घटनेची मोडतोड केली. कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्याचेच कायदे मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. राज्यात ओबीसी - मराठा वाद हा कधीच नसतानाही आता भाजपवाल्यांना काही काम नसल्याने ते अशाप्रकारे भांडणे लावण्याचे काम करीत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार लाड यांनी दिली.

हेही वाचा - जर्किंगची लेस लाकडी खुंटीला बांधून खेळत असताना गळफास; 9 वर्षीय मुलाचा मुत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.