ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यातील सर्व लहान मुलांची तपासणी होणार

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील शून्य ते पंधरा वर्षे वयोगटातील लहान मुलांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये त्या मुलांच्या रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यावरून त्या बालकांच्या रोग प्रतिकारक क्षमतेची माहिती मिळणार आहे. त्यानंतर त्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

Breaking News
author img

By

Published : Jun 1, 2021, 8:12 AM IST

पंढरपूर- कोरोनाबाबतचे दुसऱ्या लाटेतील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मात्र या लाटेचा लहान मुलांवर प्रभाव असल्याचे आढळले आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा परिषदेकडून उपाययोजनांवर भर दिला जात आहे. तिसऱ्या लाटे आधीच जिल्ह्यातील अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व बालकांचे सर्वेक्षण केले जाणार

लहान मुलांची तपासणी होणार
लहान मुलांची तपासणी होणार

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील शून्य ते पंधरा वर्षे वयोगटातील लहान मुलांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये त्या मुलांच्या रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यावरून त्या बालकांच्या रोग प्रतिकारक क्षमतेची माहिती मिळणार आहे. त्यानंतर त्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

बाल कोविड सेंटरची निर्मिती होणार

जिल्ह्यात बालकांचे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी तज्ञांची मदत घेण्यात आली आहे. शून्य ते तीन वर्षे वयोगटातील मुले घरी आईजवळ असतात, व तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुले अंगणवाडीत असतात. सध्या कोरोनामुळे अंगणवाड्या बंद असल्या तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे त्यांच्यावर लक्ष आहे. त्यानंतर पहिली ते दहावीपर्यंतची मुले शाळेत असतात. शून्य ते तीन वयोगटातील मुलांना कोविडची बाधा झाल्यास हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार करणे कठीण होणार आहे.

हेही वाचा- दिलासादायक! राज्यात आज कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणााऱ्यांची संख्या दुप्पट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.