ETV Bharat / state

अकलूज पोलिसांच्या सतर्कतेमुळे आगीत सापडलेल्या डॉ. नरळे कुटुंबीयांचे प्राण वाचले - महाराष्ट्र

पोलिसांनी शेजारच्या इमारतीवरुन शिडीच्या सहाय्याने चौथ्या मजल्यावर पोहचून खिडकीच्या काचा फोडून अग्निशामक दलाच्या सहाय्याने पाणी मारुन आग आटोक्यात आणली. डॉ.नरळे त्यांची पत्नी सुप्रिया, मुलगी पुजा, श्रीजा आणि मुलगा तनिष्क यांना सुखरुप बाहेर काढले.

अकलुज घटना २२२
author img

By

Published : Mar 22, 2019, 9:14 AM IST

सोलापूर - अकलूज पोलिसांच्या सतर्कतेमुळे व अथक प्रयत्नांमुळे भीषण आगीत सापडलेल्या डॉ. नरळे कुटुंबातील ५ जणांचे प्राण वाचले आहेत. अकलूज पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

अशी घडली थरारक घटना -

शहरातील जाधव कॉमक्समध्ये डॉ.शिवाजी नरळे हे चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये कुटुंबियांसह राहतात. पण, बुधवारी संध्याकाळी डॉ. नरळे हे ११ वाजेपर्यंत हॉलमध्ये काम करत होते. त्यावेळी त्याची पत्नी आणि ३ मुले बेडरुममध्ये झोपली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास हॉलमध्ये विचित्र आवाज ऐकू येत असल्याचे लक्षात आल्यावर डॉ. नरळे यांनी हॉलमधील बेडरुमचा दरवाजा उघडताच धुराचा लोट आला. आपल्या घराला आग लागल्याचे डॉ.नरळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना मोबाईलवरुन सांगितले. शेजारी राहण्याऱ्यांनी अकलूज पोलीस स्टेशनला घटनेची माहीती दिली.

अकलुज घटना

आग लागलेल्या घटनेची माहिती मिळताच अकलुज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हॉलमधुन आग लागल्याने पोलिसांना आतमध्ये जाणे शक्य होत नव्हते. अशावेळी प्रसंगावधान राखून पोलिसांनी शेजारच्या इमारतीवरुन शिडीच्या सहाय्याने चौथ्या मजल्यावर पोहचून खिडकीच्या काचा फोडून अग्निशामक दलाच्या सहाय्याने पाणी मारुन आग आटोक्यात आणली. डॉ.नरळे त्यांची पत्नी सुप्रिया, मुलगी पुजा, श्रीजा आणि मुलगा तनिष्क यांना सुखरुप बाहेर काढले. चौथ्या मजल्यावर हॉलमध्ये आग लागल्याने व सर्व कुटुंब बेडरुममध्ये असल्यामुळे त्यांना बाहेर कसे काढायचे, असा प्रश्न पोलिसांसमोर होता. पोलिसांनी खिडक्या, दरवाजे तोडून आग विझवली व ५ जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले.

अकलुज ग्रामपंचायत, सहकार महर्षि कारखाना, माळीनगर कारखाना, श्रीपुर कारखाना, पंढरपूर येथिल अग्निशामक दल मागवण्यात आले होते. अकलुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, पोलीस हेडकाँस्टेबल संतोष घोगरे, सुधीर शिंदे, दिलीप लव्हटे, अविनाश मोरे, पोलीस नाईक अनिल शिंदे, महेश पाटील, अमित खराडे, संतोष बोद्रे, होमगार्ड सोमेश्वर पवार, संजय सुरवसे, रोहीत भोसले, सागर देखणे, महेश वजाळे आणि पोलीस मित्र विशाल साठे या पथकाने ही कामगिरी पार पाडली. पोलिसांच्या या विशेष कामगिरीबद्दल कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ.सुहास वारके सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच अकलुज उपविभागिय अधिकारी मंगेश चव्हाण यांनी सर्व टिमचा सत्कार केला. तर, या कामगिरी बद्दल पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अकलुज पोलीस ठाण्याच्या या टिमला ३४ हजार रुपये बक्षिस जाहीर केले. लवकरच सर्व टिमला प्रशस्तीपत्र व बक्षिस देवुन गौरवण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Intro:सोलापूर : अकलुज पोलीसांच्या सतर्कतेमुळे व अथक प्रत्नामुळे भीषण आगीत सापडलेल्या डॉक्टर कुठूंबातील पाच जणांचे प्राण वाचले आहेत.अकलुज पोलीसांच्या या कामगिरीबद्दल सर्वच स्तरातुन त्याचे कौतुक होत आहे.
Body:अकलूजच्या जाधव काँम्पलेक्समध्ये डॉ.शिवाजी नरळे हे चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये कुटुंबियांसह राहत आहेत. पण बुधवारी संध्याकाळी डॉ नरळे हे 11 वाजेपर्यंत हॉलमध्ये काम करत होते.त्याचवेळी त्याची पत्नी तीन मुले बेडरुममध्ये झोपली होती.
रात्री साडे बारा वाजता हॉलमध्ये विचित्र आवाज ऐकू येत असल्याचे लक्षात आल्यावर डॉ. नरळे यांनी हॉलमध्ये बघण्यासाठी त्यांनी बेडरुमचा दरवाजा उघडताच धुराचा लोट आला.आपल्या घराला आग लागल्याचे डॉ.नरळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजारील व्यक्तीस मोबाईलवरुन सांगितले वशेजाऱ्यांनी लगेच अकलुज पोलीस स्टेशनला घटनेची माहीती दिली.
घटनेची माहीती मिळताच अकलुज पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यावेळी चौथ्या मजल्यावर फ्लॅटला आग लागली होती.आग हॉलमधुन लागल्याने पोलीसांना आत जाणे शक्य होत नव्हते.आशा वेळी प्रसंग अवधान राखून पोलीसांनी शेजरच्या इमारतीवरुन शिडीच्या सहाय्याने चौथ्या मजल्यावर पोहचुन खिडकीच्या काचा फोडून अग्निशामक दलाचूया सहाय्याने पाणी मारुन आग आटोक्यात आणली व डॉ.नरळे त्यांची पत्नी सुप्रिया,मुलगी पुजा,श्रीजा व मुलगा तनिष्क यांना सुखरुप बाहेर काढले.चौथ्या मजल्यावर हॉलमध्ये आग लागल्याने व सर्व कुठुंब बेडरुममध्ये असल्यामुळे त्यांना बाहेर कसे काढायचा हे पोलीसासमोर मोठे अव्हान होते.अशावेळी पोलीसांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत खिडक्या ,दरवाजे तोडून आग विझवली व पाच जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले.यावेळी अकलुज ग्रामपंचायत, सहकार महर्षि कारखाना, माळीनगर कारखाना,श्रीपुर कारखाना व पंढरपूर येथिल अग्निशामक दल मागवण्यात आले होते.Conclusion:यावेळी अकलुज पोलीस ठाण्याचे पो.नि.भगवान निंबाळकर,स.पो.नि.सागर काटे,पो.हे.काँ.संतोष घोगरे,सुधीर शिंदे,दिलीप लव्हटे,अविनाश मोरे पोलीस नाईक अनिल शिंदे,महेश पाटील,अमित खराडे,संतोष बोद्रे होमगार्ड सोमेश्वर पवार,संजय सुरवसे, रोहीतभोसले, सागर देखणे,महेश वजाळे तसेच पोलीस मित्र विशाल साठे या पथकाने ही कामगिरी पार पाडली.पोलीसाच्या या विशेष कामगिरी बद्दल कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ.सुहास वारके सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अभिनंदन केले.तसेच अकलुज उपविभागिय अधिकारी मंगेश चव्हाण यांनी सर्व टिमचा सत्कार केला,तर या कामगिरी बद्दल पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अकलुज पोलीस ठाण्याच्या या टिमला ३४ हजार रुपये बक्षिस जाहीर करुन लवकरचं सर्व टिमला प्रशस्तीपत्र व बक्षिस देवुन गौरवण्यात येणार असल्याचे सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.