ETV Bharat / state

अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी रसत्याच्या कामाला मंजूरी; महिनाभरात काम सुरू होणार- आमदार शिंदे

author img

By

Published : Oct 11, 2020, 3:39 PM IST

या रस्त्यावर होणारे अपघात व अपघातात होणारे मृत्यू लक्षात घेता आपण आमदार झाल्यानंतर पहिल्याच विधिमंडळाच्या अधिवेशनात अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी या रस्त्याविषयी आवाज उठवला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रेय भरणे व बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर करमाळा-टेंभुर्णी या रस्त्यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत या विषयावर मार्ग काढण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार या रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी देण्यात आली आहे.

आमदार संजय शिंदे
आमदार संजय शिंदे

सोलापूर- अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी या रस्ता कामाच्या चौपदरीकरणास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे, नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या सात वर्षापासून या रस्त्याचे काम रखडल्याने करमाळा ते टेंभुर्णी दरम्यान १६५ नागरिकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत.

जातेगाव (ता. करमाळा) ते टेंभुर्णी हा ६० किलोमीटरचा रस्ता आहे. जुन्या सुप्रीम कंपनीचे काम काढून हे काम कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्‍चर लि. या कंपनीला देण्यात आले. महिनाभरात या महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली. सुप्रिम कंपनीने पंजाब नॅशनल बंकेकडून काढलेले कर्ज व बंद पडलेले काम या वादात या रस्त्याचे काम रखडले आहे. यात रस्त्याची दुरवस्था होत गेली. मध्यंतरी हा राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याचीही चर्चा सुरू होती. मात्र, हा विषय मागे पडल्याने या रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत आपण पाठपुरावा केला. त्यातून या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचा ९ ऑक्‍टोबर रोजी आदेश निघाला आहे. अशी माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली.

या रस्त्यावर होणारे अपघात व अपघातात होणारे मृत्यू लक्षात घेता आपण आमदार झाल्यानंतर पहिल्याच विधिमंडळाच्या अधिवेशनात अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी या रस्त्याविषयी आवाज उठवला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रेय भरणे व बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर करमाळा-टेंभुर्णी या रस्त्यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत या विषयावर मार्ग काढण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार या रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी देण्यात आली आहे. रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर २०२२ पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे बंधन संबंधित कंपनीवर असल्याने वेळेत काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती देखील संजय शिंदे यांनी दिली.

हेही वाचा- गोव्याची दारू सोलापुरात जप्त; ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.