ETV Bharat / state

सोलापुरातील साडेआठशे ग्रामसेवकांचे बेमुदत कामबंद आंदोलन - संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शरद भुजबळ

गेल्या काही वर्षांपासून मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्यामुळेच या सरकारच्या काळात चौथ्यांचा आंदोलन करण्याची वेळ आली आहे. तसेच हे आंदोलन ठोस निर्णय झाल्याशिवाय मागे घेतले जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शरद भुजबळ यांनी सांगितले आहे.

सोलापुरातील साडेआठशे ग्रामसेवकांचे बेमुदत कामबंद आंदोलन
author img

By

Published : Aug 23, 2019, 10:57 PM IST

सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी 856 ग्रामपंचायतींना कुलूप लावून त्यांच्या चाव्या आणि शिक्के तालुक्यातील गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करत कामबंद आंदोलन केले आहे. विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. गेल्या काही वर्षांपासून मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्यामुळेच या सरकारच्या काळात चौथ्यांचा आंदोलन करण्याची वेळ आली आहे. तसेच हे आंदोलन ठोस निर्णय झाल्याशिवाय मागे घेतले जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शरद भुजबळ यांनी सांगितले आहे.

ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे एकच पद तयार करावे. ग्रामसेवक संवर्गास शासन निणर्याप्रमाणे प्रवास भत्ता मंजूर करणे, ग्रामसेवक शैक्षणिक अहर्ता बदलून पदवीधर ग्रामसेवक देणे, सन 2005 नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्य व जिल्हा स्तरावरील आदर्श ग्रामसेवकांना एक जादा वेतनवाढ देणे, सन 2011 च्या लोकसंख्येवर आधारीत राज्यभर सज्जांची पुर्नरचना करणे आणि ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकारी यांची कार्यालये व पदवाढ करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामसेवक महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन या संघटनेच्यावतीने शासन दरबारी आंदोलने करीत आहेत. त्यासाठी वेळोवेळी लेखी निवेदन देण्यात येऊन सुध्दा शासनाने एकही मागणी निकाली काढलेली नसल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.

यासाठी पुन्हा 22 ऑगस्ट पासून राज्यभरात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलना दरम्यान ग्रामसेवकांनी आपले सही शिक्के व कार्यालयाच्या चाव्या गट विकास अधिकार्‍यांकडे सुपूर्द केल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील सर्व 94 गावांमधील ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या चाव्या गटविकास अधिकारी रविकरण घोडके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Intro:mh_sol_03_gramsevak_andolan_7201168
ग्रामसेवकांचे बेमुदत कामबंद आंदोलन,
सोलापूर जिल्ह्यातील साडे आठशे ग्रामपंचायतीला कुलूप लावून चाव्या आणि शिक्के प्रशासनाकडे जमा

सोलापूर-
सोलापूर जिल्ह्यातील 856 ग्रामपंचायतींना कुलूप लावून त्याच्या चाव्या आणि शिक्के तालुक्यातील गटविकास अधिकारी यांच्या कडे सुपूर्द केल्या आहेत. विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. Body:शासन व ग्रामस्थ यांच्यातील महत्वाचा दुवा असणार्‍या राज्यातील सर्वच ग्रामसेवकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी चौथ्यांदा बेमुदत कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 856 असल्यामुळे जवळपास ग्रामपंचायतींना टाळे लागले असुन ग्रामसेवकांनी आपले शिक्के व कार्यालयाच्ंया चाव्या गटविकास अधिकार्‍यांकडे सुपूर्त केल्या आहेत. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा ग्रामसेवक संघटनांच्यावतीने देण्यात आला आहे.

ग्रामसेवक - ग्रामविकास पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे एकच पद तयार करावे. ग्रामसेवक संवर्गास शासननिणर्या प्रमाणे प्रवास भत्ता मंजूर करणे, ग्रामसेवक शैक्षिणीक अहर्ता बदलून पदविधर ग्रामसेवक देणे, सन 2005 नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्य व जिल्हा स्तरावरील आदर्श ग्रामसेवकांना एक जादा वेतनवाढ देणे, सन 2011 च्या लोकसंख्येवर आधारीत राज्यभर सजांची पुर्नरचना करून ग्रामसेवक- ग्रामविकास यांची सजे व पदवाढ करण्यात यावी आदी मागण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामसेवक महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन या संघटनेच्यावतीने शासन दरबारी आंदोलने करीत आहे. त्यासाठी वेळोवेळी लेखी निवेदन देण्यात येवून सुध्दा शासनाने एकही मागणी निकाली काढलेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

22 ऑगस्ट पासून राज्यभरात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलना दरम्यान ग्रामसेवकांनी आपले सही शिक्के व कार्यालयाच्या चाव्या गट विकास अधिकार्‍यांकडे सुपूर्त्र केल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील सर्व 94 गावांमधील ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या चाव्या गट विकास अधिकारी रविकरण घोडके यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या या प्रसंगी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जो पर्यंत शासन मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन ग्रामसेवकांनी पुकारले आहे.

जिल्ह्यातील 856 ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या चाव्या व शिक्के त्या त्या भागातील गटविकास अधिकार्‍यांकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. परंतु मागण्या मान्य न झाल्यामुळेच या सरकारच्या काळात चौथ्यांचा आंदोलन करण्याची वेळ आली असुुन हे आंदोलन ठोस निर्णय झाल्याशिवाय मागे घेतले जाणार नाही असे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शरद भुजबळ यांनी सांगितले आहे.

Conclusion:बाईट- शरद भुजबळ, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.