ETV Bharat / state

'ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पंढरपूर तालुका प्रशासन सज्ज'

पंढरपूर तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर एकूण ३३३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याचे समोर आले आहे. यापैकी किती उमेदवार आपले अर्ज कायम ठेवतात हे चित्र दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

author img

By

Published : Jan 3, 2021, 10:55 AM IST

grampanchayat news
'ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पंढरपूर तालुका प्रशासन सज्ज'

पंढरपूर - राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पंढरपूर तालुक्यात 72 ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून, निवडणूकीसाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

50 अधिकार्‍यांसह एक हजार 380 कर्मचारी नियुक्त

ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 साठी तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीसाठी 1 लाख 9 हजार 194 पुरुष मतदार व 96 हजार 206 स्त्री मतदार तसेच इतर 1 असे एकूण 2 लाख 5 हजार 401 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी 72 ग्रामपंचायतीसाठी 279 प्रभाग तर यासाठी एकूण सदस्य संख्या 776 आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 50 निवडणुक निर्णय अधिकारी तसेच 1 हजार 380 कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार विवेक सांळुखे, निवडणुक नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे, महसूल सहाय्यक एस.बी.कदम यांच्यासह इतर कर्मचारी पुढाकार घेत असल्याचे उपविभागीय अधिकारी ढोले यांनी सांगितले.

तालुक्यात 72 ग्रामपंचायतींसाठी 3 हजार 333 अर्ज दाखल

ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 साठी तालुक्यातील 72 ग्रामपंचायती निवडणूकीसाठी 3 हजार 333 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत 33 अर्ज अपात्र झाले आहेत. 4 जानेवारी दुपारी 3.00 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजनी होणार असल्याचेही ढोले यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.