सोलापूर - युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ-माढा तालुक्यांचा दुष्काळी दौरा केला. यावेळी ठाकरे यांनी पहिली भेट मोहोळ तालुक्यातील सारोळे येथील शेतकऱ्यांना दिली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पाणी-चारा टंचाई आणि प्रलंबित जलसिंचनाच्या योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर आष्टी-पोखरपूर तलावातून युतीच्या राज्यापासून रखडलेल्या योजना मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं.
तुम्हाला होणाऱ्या त्रासाची मला कल्पना आहे. पण त्यावर उपाय केले पाहिजेत. मी तुमच्या जनावरांसाठी मक्याचं लोणचं आणले आहे असं ठाकरेंनी म्हटल्यावर शेतकऱ्यांची उत्सुकता वाढली. कारण मक्याचं लोणचं हा शब्द प्रयोग नवा होता. पण मक्याच्याला सोलापूर जिल्ह्यात 'मुरघास' असं म्हणतात. हेच शहरी असलेल्या आदित्य ठाकरेंना म्हणायचं होतं. हे लक्षात आल्यावर लोकांना त्यांच्या बोलीचं कौतुक वाटलं. त्याचबरोबर एकीकडं सरकारी चारा छावण्या, पाण्याचे टँकर लालफितीत अडकलेले असताना ठाकरे यांनी केलेली ही मदत ही दिलासा देणारी ठरली.
दौरा संपला पण चर्चा होती ती मक्याच्या लोणच्याची
मका फुलोऱ्यात आल्यावर, ताटाला तोडून एक एक इंचाचे तुकडे केले जातात. एक दिवस वाळवून ते मोठ्या हौदात किंवा प्लास्टिक दबई करीत त्यातली हवा काढून टाकली जाते. आर्द्रता संपवली जाते. त्यात मिनरल क्षार आणि काही कल्चर मिक्स करून २१ ते ४२ दिवस साठवून त्याला आंबवले जाते. त्यातून सुक्ष्म घटक द्रव्यघटक जनावरांना मिळतात ते ऐन उन्हाळ्यात तग धरून राहतात.