सोलापूर - एका अल्पवयीन गतीमंद मुलीला चॉकटेलचे आमिष दाखवून बलात्कार केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.एल. जोशी यांनी आरोपी आकाश टोपू पवार (वय 20 वर्षे) यास पंधरा वर्षे सक्त मजूरीची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच पीडित मुलीला नुकसानभरपाई म्हणून पन्नास हजार रुपये देण्याचेही सांगितले आहे. या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
2018 साली घडली होती घटना
आरोपी आकाश पवारने 10 ऑगस्ट, 2018ला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरामागे असलेल्या एका बांधकामावर अल्पवयीन गतिमंद मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी घाबरलेल्या अवस्थेत घरी परली. आईने विचारण्या केल्यानंतर पीडितेने सर्व प्रकार सांगितले. त्यानंतर पीडितेच्या आईने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत पूर्ण तपास करुन न्यायालयात खटला दाखल केला.
न्यायालयात पीडित मुलीची साक्ष महत्वपूर्ण ठरली
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक घाडगे यांनी न्यायालयात दोषरोपपत्र दाखल केले. या खटल्यात एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी आणि त्याची आईची साक्ष महत्वपूर्ण ठरली. कोर्टाने पीडित मुलीची साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी आकाश पवार यास पंधरा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.
पीडित मुलीस 50 हजार रुपये नुकसानभरपाई
पीडित मुलगी ही गतिमंद आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे. कोर्टाने आरोपीस शिक्षा ठोठावताना पीडित मुलीस 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे देखील आदेश दिले आहे.
हेही वाचा - पंतप्रधान आवास योजनेतील 892 घरांची पंढरपुरात ऑनलाइन सोडत
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी विजयसिंह देशमुखांची निवड