ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणूक : पंढरपूरमधून 134, तर अकलूजमधून 62 आरोपी हद्दपार

author img

By

Published : Jan 12, 2021, 10:12 PM IST

ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून अकलूज परिक्षेत्र हद्दीतून 62 जणांना, तर पंढरपूर तालुक्यातून 134 जणांना हद्दपारीच्या नोटीस देण्यात आल्या आहेत.

accused from pandharpur and akluj  deported by solapur police
ग्रामपंचायत निवडणूक : पंढरपूर तालुक्यातून 134, तर अकलूजमधून 62 आरोपी हद्दपार

पंढरपूर (सोलापूर) - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा जोर धरला आहे. या निवडणुकीदरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अकलूजमधून 62 जणांना, तर पंढरपूर तालुक्यातून 134 जणांना हद्दपारीच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुका शांततेच्या मार्गाने होण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया

पंढरपूर तालुक्यातील 134 आरोपींना हद्दपारीची नोटीस -

पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये व मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये, यासाठी पंढरपूर तालुक्यातील प्रमुख गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 134 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. त्यातील तालुक्यातील करकंब व पंढरपूर तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या गावांमधील गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ही हद्दपारीची कारवाई अल्प काळासाठी असणार आहे.

अकलूज परिक्षेत्रतून 62 जण हद्दपार -

माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील परिक्षेत्रातील 16 गावांमधील ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकींमध्ये अकलूज पोलीस ठाण्याअंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांना 62 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना 8 ते 18 जानेवारी या कालावधीमध्ये अकलूज परिक्षेत्रमध्ये राहण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - केंद्र सरकार आंधळे अन बहिरे, विश्वजीत कदम यांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.