ETV Bharat / state

सोलापूर शहरात 84 तर ग्रामीण भागात 66 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ

सोलापूर शहरात 84 तर ग्रामिण भागात 66 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 हजार 699 इतका झाला आहे.

file photo
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jul 10, 2020, 2:42 AM IST

सोलापूर - शहरात गुरुवारी (दि. 9 जुलै) 84 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली असून 5 वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात 66 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांचा आकडा 3 हजार 699 वर पोहोचला आहे.

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी 163 जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 79 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 84 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामध्ये 49 पुरुष व 35 महिलांचा समावेश आहे. सोलापूर महापालिका हद्दीत गुरुवारपर्यंत बाधितांचा एकुण आकडा 3 हजार 26 वर पोहोचला असून मृतांची संख्या 292 इतकी झाली आहे.

सोलापूर ग्रामीण भागातील 66 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 41 पुरुष व 25 महिलांचा समावेश आहे. गुरुवारपर्यंत सोलापूर ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 673 इतकी झाली आहे. तर 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हाधिकऱ्यांनी बुधवारी रॅपिड अँटीजेन टेस्ट जलद गतीने करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाला दिल्या आहेत. तर महापालिका प्रशासनाने सोलापूर शहरात सोशल डिस्टन्सवर भर देत शहरवासीयांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तर पोलीस प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांवर व दुचाकीवर डबल सीट फिरणाऱ्या बेशिस्त वाहनधारकावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

हेही वाचा - पोलिसांनी आवळल्या अल्पवयीन चोराच्या मुसक्या; जप्त केला दीड लाखांचा ऐवज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.