ETV Bharat / state

पूरग्रस्तांच्या प्रेरणेसाठी युरोपच्या सर्वोच्च शिखरावर फडकला 73 फुटी तिरंगा; 360 एक्सप्लोरर गटाची कामगिरी - माउंट एलब्रुस बेसकॅम्प

'360 एक्सप्लोरर' या गटाने भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी 73 फुटी तिरंगा युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर फडकवला आहे. कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त लोकांना संकटातून सावरण्याची प्रेरणा देण्यासाठी खास कोल्हापुरी फेटा बांधून, या पथकाने तिरंग्याला अभिवादन केले.

पूरग्रस्तांच्या प्रेरणेसाठी युरोपच्या सर्वोच्च शिखरावर फडकला 73 फुटी तिरंगा; 360 एक्सप्लोरर गटाची कामगिरी
author img

By

Published : Aug 15, 2019, 10:57 PM IST

Updated : Aug 15, 2019, 11:03 PM IST

सोलापूर - मराठी मुलखातील सह्याद्रीच्या मावळ्यांनी अफलातून विश्वविक्रम केला आहे. '360 एक्सप्लोरर' या गटाने भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी 73 फुटी तिरंगा युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर फडकवला आहे. कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त लोकांना संकटातून सावरण्याची प्रेरणा देण्यासाठी खास कोल्हापुरी फेटा बांधून, या पथकाने तिरंग्याला अभिवादन केले.

पूरग्रस्तांच्या प्रेरणेसाठी युरोपच्या सर्वोच्च शिखरावर फडकला 73 फुटी तिरंगा; 360 एक्सप्लोरर गटाची कामगिरी

'360 एक्सप्लोरर' या पथकाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावरील माती, छत्रपतींची प्रतिमा एलब्रुस शिखरावर नेली आहे. या गटाने 15 ऑगस्ट रोजी युरोपातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवण्याची मोहीम हाती घेतली होती. यात 10 वर्षांचा साई कवडे हा एलब्रुस शिखर सर करणारा आशियातील सर्वात लहान मुलगा ठरला आहे. आज 15 ऑगस्ट रोजी अंतिम चढाईला निघण्यापूर्वी आनंद बनसोडे, साई कवडे, सागर नलावडे (कोल्हापूर), भूषण वेताळ (औरंगाबाद), तुषार पवार (सातारा) यांनी 73 फुटी तिरंगा एलब्रुस बेसकॅम्प (13000 फूट) वर फडकावला. विदेशात सर्वात लांब तिरंगा फडकवण्याचा विक्रम या गटाने प्रस्थापित केला आहे. गट प्रमुख आनंदने जुलै 2014 मध्ये हे शिखर सर केले होते. आता तो या टीमला मार्गदर्शक म्हणून पुन्हा मोहिमेवर गेला आहे.

Intro:सोलापूर : मराठी मुलखातील सह्याद्रीच्या मावळ्यांनी अफलातून विश्वविक्रम केली असून भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी 73 फुटी तिरंगा युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर फडकवलाय.विशेष 360 एक्सप्लोररच्या या टीमनं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावरील माती, छत्रपतींची प्रतिमा एलब्रूस शिखरावर नेली आहे.
Body:360 एक्सप्लोरर मार्फत 15 ऑगस्ट रोजी युरोपातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवण्याची मोहीम आयोजित केली गेली होती.यात 10 वर्षाचा साई कवडे हा एलब्रूस शिखर सर करणारा आशियातील सर्वात लहान मुलगा ठरणार आहे.आज 15 ऑगस्ट रोजी अंतिम चढाईला निघण्यापूर्वी आनंद बनसोडे, साई कवडे,कोल्हापूरचा सागर नलावडे, औरंगाबादचा भूषण वेताळ,साताऱ्याचा तुषार पवार यांनी 73 फुटी तिरंगा एलब्रूस बेसकॅम्प (13000 फूट) वर फडकावून विदेशात सर्वात लांब तिरंगा फडकवण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.टीम लीडर आनंदनं जुलै 2014 मध्ये हे शिखर सर केले होते आता तो या टीमला मार्गदर्शक म्हणून पुन्हा या मोहिमेवर गेला आहे.

Conclusion:कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त लोकांना या संकटातून सावरण्याची प्रेरणा देण्यासाठी युरोपातील सर्वोच्च शिखराच्या बेसकॅम्पवर खास कोल्हापुरी फेटा बांधून या टीमने तिरंग्याला अभिवादन केले.
Last Updated : Aug 15, 2019, 11:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.