ETV Bharat / state

कोरोना : वाढदिवसाचे पैसे सहाय्यता निधीला, चिमुकल्या आराध्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

author img

By

Published : Apr 5, 2020, 8:26 AM IST

Updated : Apr 5, 2020, 11:22 AM IST

सोलापूरच्या सात वर्षीय आराध्याने कोरोनाच्या या संकटात वाढदिवस साजरा न करता वाढदिवसावर खर्च होणारे पैसे हे मुख्यमंंत्री आणि पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देण्याचे ठरविले. तिच्या या कार्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे.

वाढदिवसाचे पैसे सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय

सोलापूर - कोरोनामुळे आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसावर होणारा खर्च हा कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी देण्याचा निर्णय सोलापूरातील एका चिमुकलीनं घेतला आहे. आराध्या कडू या सात वर्षीय मुलीने तिचा वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्यता निधीला प्रत्येकी 5 हजार रुपये दिले आहेत.

वाढदिवसाचे पैसे सहाय्यता निधीला देऊन मदत करणाऱ्या चिमुकल्या आराध्या कडूचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

प्रत्येकाला आपला वाढदिवस साजरा करण्याची हौस असते. मात्र, सोलापूरच्या सात वर्षीय आराध्याने कोरोनाच्या या संकटात वाढदिवस साजरा न करता वाढदिवसावर खर्च होणारे पैसे हे सहाय्यता निधीसाठी देण्याचे ठरविले. लहान वय हे हट्ट करण्याचे असते. मात्र, आराध्याने दाखवलेला हा समजूतदारपणा मोलाचा ठरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि कडू कुटुंबीयांचे कौतुक केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्यासह तिचे कुटुंबीय भारावून गेले.

आराध्याने वाढदिवस साजरा न करता ते पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पीएम केअर्स निधीला दिले. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी जनतेशी संवाद साधतांना आराध्याचे कौतुक केले. आराध्या अजय कडू हिने वाढदिवसासाठी खर्च करण्यात येणारे 10 हजार रुपये कोरोनाविरुध्दच्या लढाईसाठी दिले. आराध्या हि बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर अजय कडू यांची कन्या आहे. शनिवारी तिचा सातवा वाढदिवस होता. मात्र, वाढदिवस साजरा न करता हे पैसे आपण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला द्यायचे का, असे अजय कडू यांनी आराध्या आणि मुलगा आर्यन यांना विचारले. यावर त्या दोघांनीही पैसे द्या, असे लगेच सांगितले. त्यानुसार कडू यांनी शनिवारी पाच हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पाच हजार पीएम केअर्स फंडसाठी जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द केले.

आराध्या ही पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीत शिकते. बोलक्या स्वभावाची आराध्या स्केटींग उत्तम करते. तर, तिचा भाऊ आर्यन आठव्या इयत्तेत आहे. अजय कडू मूळचे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे आहेत. कडू यांची नुकतीच झोनल मॅनेजर पदावर पदोन्नती झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आराध्याची दखल घेऊन तिचे कौतुक केले. याबद्दल आम्ही सर्व कुटुंबीय अतिशय आभारी आहोत, असे अजय कडू यांनी सांगितले.

Last Updated : Apr 5, 2020, 11:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.