सोलापूर - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद प्रदर्शनासाठी जात असताना बार्शी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या क्रूझरची एसटीला धडक बसली. सोलापूर-बार्शी रस्त्यावरील या भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाले होते, तर सहा जखमी होते. उपचारादरम्यान यातील आणखी दोघांचा मृत्यू झाला असून आता हा आकडा पाचवर गेला आहे.
अपघातातील मृतांची नावे
१.काळे छगन लिंबाजी (वय -३४, पानगाव)
२.घावटे संदीप पांडुरंग (वय- २३, पांढरी)
३.काशीद देवनारायण महादेव (वय -४४, कव्हे)
४.महिंगडे संभाजी जनार्धन (वय -४९, बार्शी)
५.मोहरे राकेश अरुण (वय -३२, बार्शी)
जखमींची नावे
१.श्रीमती.शुभांगी बांडवे (वय-३५, बार्शी)
प्राथमिक उपचार झालेले
१.आखाडे वर्षा रामचंद्र (वय -३५)
२.चव्हाण कविता भगवान (वय-३१,अलिपूर)
३.मोरे रागिणी दिलीप (वय-२९, बार्शी)
४. कदम निलंकठ उत्तरेश्वर (वय-३४, पांगरी)
५.मांजरे नरसिंह महादेव (वय-५५, बार्शी)
याव्यतिरिक्त एसटीतील 9 जणांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.