हैदराबाद : Vivo S20 सीरीज लॉंच करण्यात आली आहे. कंपनीनं या वर्षी मेंमध्ये लाँच झालेल्या S19 मालिकेची ही आवृत्ती आहे. या मालिकेत Vivo S20 आणि S20 Pro स्मार्टफोन लॉंच करण्यात आले आहेत. दोन्ही फोन अनेक अपग्रेड फीचर्ससह बाजारात दाखल झाले आहेत.
किंमत : Vivo S20 आणि S20 Pro 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह लॉंच करण्यात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोन फिनिक्स फेदर गोल्ड आणि लूज स्मोक इंक रंगात येतात. प्रो व्हेरियंटला पर्पल एअर शेड देखील मिळत असून व्हॅनिला मॉडेल जेड ड्यू व्हाइटमध्ये उपलब्ध आहे. S20 आणि S20 Pro अनुक्रमे CNY 2,299 (अंदाजे 26 हजार 790) आणि CNY 3,399 (अंदाजे 39 हजार 600) पासून सुरू होतात.
Vivo S20, Vivo S20 Pro वैशिष्ट्य
डिस्प्ले : Vivo S20 आणि S20 Pro दोन्हीमध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.67-इंच AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 5,000 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आणि HDR10+ सपोर्ट आहे. स्टँडर्ड मॉडेलमध्ये फ्लॅट पॅनल आहे, तर प्रो व्हेरियंटमध्ये वक्र स्क्रीन आहे.
कॅमेरा : S20 मध्ये 50MP मुख्य आणि 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. दुसरीकडं, S20 Pro मध्ये 50MP Sony IMX921 प्राथमिक सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड आणि 3x झूमसह 50MP पेरिस्कोप शूटर आहे. दोन्ही फोनमध्ये 50MP फ्रंट स्नॅपर आहे.
प्रोसेसर : Vivo S20 स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, तर S20 Pro डायमेंसिटी 9300+ प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.
बॅटरी : S20 मध्ये 6,500mAh बॅटरी आहे जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. S20 Pro मध्ये 5,500mAh बॅटरी आहे, जी 90W चार्जिंगला सपोर्ट करते.
सॉफ्टवेअर आणि इतर वैशिष्ट्ये : Vivo S20 मालिका आधीपासूनच OriginOS 5-आधारित Android 15 सह आली आहे. फोनमध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर, स्टिरिओ स्पीकर, USB-C आणि ड्युअल-बँड GPS आहे.
Vivo V50 मालिका लवकरच लॉंच होणार आहे. Vivo चे S-Series स्मार्टफोन्स Vivo V-series म्हणून जागतिक बाजारात लॉंच करण्यात आले आहेत. S20 लाइनअप V50 म्हणून लॉंच होण्याची अपेक्षा आहे. Vivo V50 मालिका येत्या काही दिवसांत भारत आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश करू शकते.
हे वाचलंत का :