ETV Bharat / state

पंढरपूर तालुक्यात निराधार योजनेतील ३४ प्रकरणे मंजूर - Niradhar Yojana Solapur

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या संबधित लाभार्थ्यांनी तातडीने अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बँक पासबुकची छायांकित प्रत व फोटो तात्काळ पंढरपूर तहसील कार्यालयात जमा करावा. तसेच, तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहनही तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केले.

तहसील कार्यालय पंढरपूर तालुका
तहसील कार्यालय पंढरपूर तालुका
author img

By

Published : Oct 11, 2020, 4:42 PM IST

सोलापूर- संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक पार पडली होती. यात पंढरपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील २८, तर श्रावणबाळ योजनेतील ६ प्रकरणे, अशी एकूण ३४ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. अशी माहिती तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.

निराधारांचे जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. संजय गांधी निराधार योजनेमध्ये अपंग, निराधार, दुर्धर आजाराने पीडित व्यक्ती, तसेच ६५ वर्षावरील नागरिकांना श्रावणबाळ योजनेचा लाभ घेता येतो. तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे एकूण ३ हजार १०२, तर श्रावणबाळ योजनेचे १ हजार ९३० लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांचे ऑगस्ट २०२० पर्यंतचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. अशी माहिती तहसीलदार वाघमारे यांनी दिली.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या संबधित लाभार्थ्यांनी तातडीने अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बँक पासबुकची छायांकित प्रत व फोटो तात्काळ पंढरपूर तहसील कार्यालयात जमा करावा. तसेच, तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहनही तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केले.

हेही वाचा- महामार्ग पोलिसांनी जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान 75 लाखांचा दंड केला वसूल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.