ETV Bharat / state

सांगोला कारागृहातील 26 कैद्यांना कोरोनाची लागण - सांगोला सब जेल

तीन कैद्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये अहवाल हा पॉझिटिव आल्यामुळे त्यांना कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी अजून काही कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून 23 कैदी हे बाधीत आढळले आहेत. पोलीस प्रशासनाकडून योग्य दक्षता घेतल्यामुळे कोरोना आटोक्यात आला आहे.

कैद्यांना कोरोना
कैद्यांना कोरोना
author img

By

Published : May 8, 2021, 6:04 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - जिल्ह्यात कोरोना परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका आता कैद्याही बसत आहे. सांगोला सब कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. 26 कैद्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर कोरोना बाधित आढळले आहे. त्यामुळे सांगोला पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यामध्ये रोज हजारो कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यात सांगोला तालुक्यातील कोरोनाची दुसरी लाट दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेत सांगोला सब कारागृहात कोरोनाने शिरकाव केला आहे. साठ पैकी सुमारे 26 कैदी कोरोना ग्रस्त झाले आहे. त्या सर्वांना प्राथमिक उपचारासाठी सांगोला येथील सिंहगड महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आली आहे. तर इतर कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. यातच सांगोला सब कारागृहात कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तीन दिवसापूर्वी तीन कैद्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये अहवाल हा पॉझिटिव आल्यामुळे त्यांना कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी अजून काही कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून 23 कैदी हे बाधीत आढळले आहेत. पोलीस प्रशासनाकडून योग्य दक्षता घेतल्यामुळे कोरोना आटोक्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.