ETV Bharat / state

कार्तिकी वारी निमित्ताने विठ्ठलाचे 24 तास 'ऑनलाइन' दर्शन - 24 hours online darshan of vitthal

कार्तिकी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचे २४ तास ऑनलाइन दर्शन भाविकांना घेता येणार आहे. यासाठी मंदिर समिती दिलेल्या संकेतस्थळावर भाविकांना जावे लागणार आहे.

फोटो सौजन्य मंदिर समिती
फोटो सौजन्य मंदिर समिती
author img

By

Published : Nov 19, 2020, 5:04 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तापासून १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकी यात्रा होत आहे. प्रत्येक वर्षी कार्तिकी यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून विठ्ठलाचा पलंग काढून भाविकांना २४ तास ऑनलाइन दर्शन उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

मंदिर प्रशासनाकडून गुरुवारी सकाळी ११:५५ वाजता परंत्यामुळे आजपासून विठ्ठलाची काकडा आरती, पोषाख, धुपारती, शेजारती इ. राजोपचार बंद राहतील. मात्र, नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता एवढेच राजोपचार सुरू राहतील. विठ्ठल पलंग काढल्याने www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर, मोबाईल अ‌ॅप, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान विठ्ठलाचे दर्शन २४ तास सुरू राहील. मात्र, राज्य शासनाने १४ नोव्हेंबर, २०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार विठ्ठलाचे मुखदर्शन कार्तिकी यात्रा कालावधीत कोणत्या दिवशी व वेळी उपलब्ध राहील, याची नव्याने सूचना मंदिर समितीकडून देण्यात येईल, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

आषाढी वारी प्रमाणे कार्तिकी वारी ही रद्द करावी, या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे कार्तिकी वारी होणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व कार्तिकी वारीमध्ये वारकऱ्यांची होणारी गर्दी यामुळे कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असल्यामुळे रद्द करण्याची, मागणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.