ETV Bharat / state

सोलापूर : 11 विधानसभा मतदारसंघात 154 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात - शिवसेना-भाजप युती

उमेदवारी अर्ज माघारी घ्यायच्या शेवटच्या दिवशी एकूण 83 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. 11 विधानसभा मतदारसंघापैकी 3 मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे या ठिकाणी 2 बॅलेट मशीन लावाव्या लागणार आहेत.

राजेंद्र भोसले
author img

By

Published : Oct 7, 2019, 10:32 PM IST

सोलापूर - जिल्ह्यातील एकूण 11 विधानसभा मतदार संघात 154 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घ्यायच्या शेवटच्या दिवशी एकूण 83 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. 11 विधानसभा मतदारसंघापैकी 3 मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे या ठिकाणी 2 बॅलेट मशीन लावाव्या लागणार आहेत. यामध्ये सांगोला, सोलापूर शहर मध्य आणि पंढरपूर या 3 मतदारसंघाचा समावेश आहे.

शिवसेनेच्या विद्यमान आमदारासह जिल्हा प्रमुखाची बंडखोरी -

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या 3 तगड्या उमेदवारांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी करमाळा मतदारसंघात अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी देखील सोलापूर शहर मध्य मतदारसंघात अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात शिवसेनेचे समाधान आवताडे यांनी बंडखोरी केली आहे.

हेही वाचा - मंगळवेढा कारागृहातून आरोपीचे पलायन; गुन्हा दाखल

मागच्या विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे हे शिवसेनेकडून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. त्यांनी आता या मतदारसंघातून आमदारकीसाठी अर्ज कायम ठेवला आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजीराव काळुंगे यांना पक्षाने एबी फॉर्म दिलेला होता. काळुंगे यांनी उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवत आहे.

दक्षिण सोलापुरात थेट लढत - सहकारमंत्र्यांचा मार्ग सुकर

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसचे बाबा मिस्त्री उभे आहेत. सध्या तरी देशमुखांना ही लढत अगदी सोपी झाली आहे. या मतदारसंघात एमआयएचे अमितकुमार अजनाळे आणि वंचितचे युवराज राठोड हे उमेदवार असले तरी प्रमुख लढत ही काँग्रेस आणि भाजप यांच्यातच होईल, असे चित्र सध्यातरी आहे. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी वाटते. कारण मागील वर्षी निवडणुकीत सहकारमंत्र्यांच्या विरोधात असलेले दिलीप माने आणि गणेश वानकर हे देशमुखांच्या गळ्यात गळे घालून प्रचार करत आहेत.

करमाळ्यात तिरंगी लढत-

करमाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवली आहे. शिवसेनेने विद्यमान आमदाराचे तिकीट कापून ऐनवेळी राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना तिकीट दिल्याने आमदार पाटील यांनी बंडखोरी केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढलेले आणि विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमाम शिंदे हे देखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आपली उमेदवारी माघारी घेत संजयमामांना पाठिंबा दिला आहे. तर संजयमामांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतल्याने राष्ट्रवादीला ऐनवेळी संजय पाटील घाटणेकरांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीची उमदेवारी असली तरीही करमाळ्यात फाईट ही रश्मी बागल, संजयमामा आणि नारायण पाटील या तिघांमध्ये असणार आहे.

माढ्यातही थेट लढत, शिवाजी कांबळेंची माघार अन् राजकीय संन्यास

माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवाजी कांबळे यांनी दंड थोपटले होते. त्यांना कोणत्यातरी मोठ्या पक्षाची उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. मात्र, ती न मिळाल्याने त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज काढून घेतला आहे. तसेच त्यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता बबन शिंदेंना लढाई सोपी झाली असून महायुतीच्या संजय कोकाटेंशी थेट लढत होत आहे.

माळशिरसमध्ये राम सातपुते अन् जानकर यांच्यात थेट लढत -

माळशिरस मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नसल्यामुळे ऐनवेळी भाजपमध्ये गेलेल्या उत्तम जानकर यांना राष्ट्रवादीने उमदेवारी दिली. तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपकडून मोहिते-पाटील समर्थकाला उमेदवारी मिळेल, असे वाटत असताना संघात कार्य केलेल्या राम सातपुते यांना उमदेवारी देऊन त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपने मोहिते-पाटलांवर सोपवली आहे.

हेही वाचा - तुम्ही मला माझ्या विकास कामांमुळे नाकारणार नाही - नारायण पाटील

पंढरीत भालके-पंत-काळुंगे-आवताडे चौरंगी लढत -

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून शैला घोडसे यांनी माघार घेतली आहे. महायुतीचे सुधाकरपंत परिचारक, काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये गेलेले विद्यमान आमदार भारत भालके, आघाडीचा धर्म न पाळता उमेदवारी दाखल केलेले शिवाजीराव काळुंगे आणि शिवसेनेचे बंडखोर समाधान आवताडे यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी असली तरीही पंढपुरात मात्र दोन्ही उमेदवार पक्षाच्या चिन्हावर एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.

सांगोल्यात शेकाप विरोधात राष्ट्रवादीचे बंड-

वर्षानुवर्षे सांगोल्यात राष्ट्रवादी आणि शेकापची आघाडी असताना या निवडणुकीत मात्र या आघाडीत बिघाडी झाली आहे. विद्यमान आमदार गणपतराव देशमुख यांनी नातवाला वारसदार म्हणून पुढे केले. मात्र, राष्ट्रवादीने या ठिकाणी माजी आमदार दिपक साळुंखे यांना उभे केले आहे. तर महायुतीने माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी दिल्याने आता सांगोल्यात गणपत देशमुखांची जादू चालणार का? आणि नातवाला जनता विधानसभेत पाठवणार का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

पालकमंत्र्याविरोधात राष्ट्रवादी आणि वंचित-

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात पालकमंत्री विजयकुमार देशमुख विरोधात राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे आणि वंचित आघाडीचे आनंद चंदनशिवे उभे आहेत. या मतदारसंघातून देशमुख 3 वेळा निवडून आले आहेत. चौथ्या वेळीही ते लाखोंच्या मतांनी निवडुन येणार, असा दावा महायुतीकडून केला जात आहे. त्यामुळे सपाटे आणि चंदनशिवे किती मते घेणार, याची गणिते मांडली जात आहेत. या ठिकाणी एमआयएमने आतिष बनसोडे यांना उमदेवारी दिली आहे.

सोलापूर शहर मध्य मतदार संघात चौरंगी लढत-

संपूर्ण राज्याचे लक्ष सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर लागले आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या हॅट्रीक मारण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसमधून सेनेत गेलेले दिलीप माने, पूर्वाश्रमीचे शिंदे यांचे विश्‍वासू अन् आता शिवसेनेचे बंडखोर महेश कोठे, कामगार नेते आडम मास्तर आणि एमआयएमकडून फारुक शाब्दी उभे आहेत. उत्तर आणि मध्य मतदारसंघात कोठे यांनी अर्ज भरले होते. उत्तरमधून माघार घेत कोठे यांनी आपली उमेदवारी मध्यमध्ये कायम ठेवल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.

बार्शीत सोपल विरूद्ध राऊत पारंपारिक लढाई-

बार्शी मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप सोपल आणि त्यांचे वर्षानुवर्षाचे राजकीय शत्रू माजी आमदार राजा राऊत यांच्यात लढाई होत आहे. सोपल यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेची उमेदवारी घेतली तर भाजपमध्ये असलेल्या राऊतांनी बंडखोरी करुन सोपलांबरोबर दोन हात केले आहेत. त्यामुळे सोपल विरुध्द राऊत ही पारंपारिक लढाई पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला पहायला मिळणार आहे.

जेलमधून रमेश कदम विधानसभेच्या आखाड्यात-

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्यात अडकलेले विद्यमान आमदार रमेश कदम हे तुरुंगातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे मोहोळ मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे. येथून राष्ट्रवादीतर्फे यशवंत माने व शिवसेनेकडून नागनाथ क्षीरसागर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या तिघांमध्येच प्रमुख लढाई होत आहे.

अक्कलकोटमध्ये म्हेत्रे विरुद्ध कल्याणशेट्टी थेट लढाई -

भाजपने वेटींगवर ठेवलेल्या आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी नाईलाजाने काँग्रेसची उमेदवारी पत्करली. तर भाजपने सचिन कल्याणशेट्टी या तरुण चेहर्‍याला उमेदवारी देत अनेकांचे मनसुबे उधळून टाकले आहेत. त्यामुळे आता अक्कलकोटमध्ये विद्यमान आमदार म्हेत्रे विरोधात सचिन कल्याणशेट्टी यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

Intro:mh_sol_05_solapur_final_candidate_7201168सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात 154 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात 
सोलापूर-
सोलापूर जिल्ह्यातील एकूण 11 विधानसभा मतदार संघात 154 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घ्यायच्या शेवटच्या दिवशी एकूण 83 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघापैकी 3 मतदार संघात 15 पेक्षा जास्त उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे राहिल्यामुळे या ठिकाणी दोन बॅलेट मशीन लावाव्या लागणार आहेत. यामध्ये सांगोला, सोलापूर शहर मध्य आणि पंढरपूर या तीन मतदार संघाचा समावेश आहे. Body:
शिवसेनेच्या विद्यमान आमदारासह जिल्हा प्रमुखाची बंडखोरी

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणूकीसाठी शिवसेनेच्या 3 तगड्या उमेदवारांनी बंडखोरी करत आमदारकी मिळविण्यासाठी बंडखोरी कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी करमाळा मतदार संघात अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी देखील सोलापूर शहर मध्य मतदार संघात अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. तर पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघात शिवसेनेचे समाधान आवताडे यांनी बंडखोरी केली आहे. मागच्या विधानसभा निवडणूकीत समाधान आवताडे हे शिवसेनेकडून पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघातून निवडणूकीला उभे होते. त्यांनी आता या मतदार संघातून आमदारकीसाठी अर्ज कायम ठेवला आहे. याच मतदार संघात कॉंग्रेसचे शिवाजीराव काळुंगे यांना पक्षांने बी फॉर्म दिलेला होता आणि त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्यामुळे या मतदार संघात राष्ट्रवादीच्या विरोधात कॉंग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवीत आहे.

दक्षिण सोलापुरात थेट लढत - सहकारमंत्र्यांचा मार्ग सूकर

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसचे बाबा मिस्त्री उभे आहेत. सध्या तरी देशमुखांना ही लढत अगदी सोपी झाली आहे. या मतदार संघात एमआयए चे अमितकुमार अजनाळे आणि वंचितचे युवराज राठोड हे उमेदवार असले तरी प्रमुख लढत ही कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातच होईल असे चित्र सध्यातरी आहे. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी वाटते कारण मागील वर्षी निवडणुकीत सहकारमंत्र्यांच्या विरोधात असलेले दिलीप माने आणि गणेश वानकर हे देशमुखांच्या गळ्यात गळे घालून प्रचार करीत आहेत.

करमाळ्यात तिरंगी लढत-

करमाळा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी बंडखोरी करीत उमेदवारी कायम ठेवली आहे. शिवसेनेने विद्यमान आमदाराचे तिकीट कापून ऐनवेळी राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना तिकीट दिल्याने आमदार पाटील यांनी बंडखोरी केली. माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढलेले आणि विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमाम शिंदे हे देखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आपली उमेदवारी माघारी घेत संजयमामांना पाठींबा दिला आहे. तर संजयमामांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतल्याने राष्ट्रवादीला ऐनवेळी संजय पाटील घाटणेकरांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीची उमदेवारी असली तरीही करमाळ्यात फाईट ही रश्मी बागल, संजयमामा आणि नारायण पाटील या तिघांतच आहे.

माढ्यातही थेट लढत , शिवाजी कांबळेंची माघार अन् राजकीय संन्यास

माढा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवाजी कांबळे यांनी दंड थोपटले होते. त्यांना कोणत्याही मोठ्या पक्षाची उमेदवारी मिळेल अशी आशा होती मात्र ती न मिळाल्याने त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेऊन राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली. त्यामुळे आता बबनदादांना लढाई सोपी झाली असून महायुतीचे संजय कोकाटें अशी थेट लढत होत आहे.

माळशिरसमध्ये राम सातपुते अन् जानकर यांच्यात थेट लढत -
माळशिरस मतदार संघात राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नसल्यामुळे ऐनवेळी भाजपमध्ये गेलेल्या उत्तम जानकर यांना राष्ट्रवादीने उमदेवारी दिली. तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदार संघात भाजपकडून मोहिते-पाटील समर्थकाला उमेदवारी मिळेल असे वाटत असताना संघात कार्य केलेल्या राम सातपुते यांना उमदेवारी देऊन त्यांना निवडूण आणण्याची जबाबदारी भाजपने मोहिते-पाटलांवर सोपविली आहे.

पंढरीत भालके-पंत-काळुंगे-आवताडे अशी चौरंगी लढत
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून शैला घोडसे यांनी माघार घेतली आहे. महायुतीचे सुधाकरपंत परिचारक, काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये गेलेले विद्यमान आमदार भारत भालके, आघाडीचा धर्म न पाळता उमेदवारी दाखल केलेले शिवाजीराव काळुंगे आणि शिवसेनेचे बंडखोर समाधान आवताडे यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस याची आघाडी असली तरीही पंढपुरात मात्र दोन्ही उमेदवारी पक्षाच्या चिन्हावर एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.

सांगोल्यात शेकाप विरोधात राष्ट्रवादीचे बंड
वर्षानुवर्षे सांगोल्यात राष्ट्रवादी आणि शेकापची आघाडी असताना या निवडणुकीत मात्र या आघाडीत बिघाडी झाली आहे. विद्यमान आमदार गणपतराव देशमुख यांनी नातवाला वारसदार म्हणून पुढे केले आहेण. मात्र राष्ट्रवादीने या ठिकाणी माजी आमदार दिपक साळुंखे यांना उभे केले आहे. तर महायुतीने माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी दिल्याने आता सांगोल्यात गणपतआबांची जादू चालणार का आणि नातवाला जनता विधानसभेत जाणार का हे निकालानंतर समजणार आहे.

सोलापूरच्या पालकमंत्र्याविरोधात राष्ट्रवादी आणि वंचित

सोलापूर शहर उत्तर मतदार संघात पालकमंत्री विजयकुमार देशमुख विरोधात राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे आणि वंचित आघाडीचे आनंद चंदनशिवे उभे आहेत. या मतदार संघातून देशमुख तीन वेळा निवडूण आले आहेत. चौथ्या टर्म देखील लाखांच्या मतांनी येणार असा दावा महायुतीकडून केला जात आहेत त्यामुळे सपाटे आणि चंदनशिवे किती मते घेणार याची गणिते मांडली जात आहेत.या ठिकाणी एमआयएमने आतिष बनसोडे यांना उमदेवारी दिली आहे.

सोलापूर शहर मध्य मतदार संघात चौरंगी लढत
संपूर्ण राज्याचे सोलापूर शहर मध्य मतदार संघात लक्ष लागले आहेत. या मतदार संघात विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या हॅटट्रीक करण्यासाठी पुन्हा उभ्या आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेसमधून सेनेत गेलेले दिलीप माने, पूर्वाश्रमीचे शिंदे यांचे विश्‍वासून आता शिवसेनेचे बंडखोर महेश कोठे, कामगारनेते आडममास्तर आणि एमआयएमकडून फारुन शाब्दी उभा राहिले आहेत.उत्तर आणि मध्य मतदार संघात कोठे यांनी अर्ज भरले होते. उत्तर मधून माघार घेत कोठे यांनी आपली उमेदवारी मध्य मध्ये कायम ठेवल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.

बार्शीत पारंपारिक सोपल-राऊत पारंपारिक लढाई

बार्शी मतदार संघात विद्यमान आमदार दिलीप सोपल आणि त्यांचे वर्षानुवर्षाचे राजकीय शूत्र माजी आमदार राजा राऊत यांच्या लढाई होत आहे. सोपल यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेची उमेदवारी घेतली तर भाजपमध्ये असलेल्या राऊतांनी बंडखोरी करुन सोपलांबरोबर दोन हात केले आहेत त्यामुळे सोपल विरुध्द राऊत ही पारंपारिक लढाई पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला पहायला मिळणार आहे.

जेलमधून निवडणूक लढविणार्‍या रमेश कदमांमुळे राज्याचे मोहोळकडे लक्ष
अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्यात अडकलेले विद्यमान आमदार रमेश कदम हे जेलमधून अपक्ष निवडणूक लढवित असल्यामुळे राज्याचे मोहोळ मतदार संघाकडे लक्ष लागले आहे. येथून राष्ट्रवादीतर्फे यशवंत माने व शिवसेनेकडून नागनाथ क्षीरसागर निवडणूक लढवित आहेत त्यामुळे या तिघांमध्येच प्रमुख लढाई होत आहे.

आ.म्हेत्रे-कल्याणशेट्टीत अक्कलकोटात थेट लढाई

भाजपने वेटींगवर ठेवलेल्या आ. सिध्दाराम म्हेत्रे यांनी नाईलाजाने काँग्रेसची उमेदवारी पत्करली. तर भाजपने सचिन कल्याणशेट्टी या तरुण चेहर्‍याला उमेदवारी देत अनेकांचे मनसुबे उधळून टाकले आहेत. या मतदार संघातून राधाकृष्ण विखे-पाटलांचे जावई गणेश माने-देशमुख यांनी तिकीट मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यामुळे आता अक्कलकोटमध्ये विद्यमान आमदार म्ळेत्रे विरोधात सचिन कल्याणशेट्टी यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.