सोलापूर - गेल्या पंधरा दिवसांपासून सोलापुरात प्रशासनाने लॉकडाऊन लागू केले आहे. पण त्याचा परिणाम काहीही होत नाही. दररोज रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 1468 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर 43 रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.
शहरात 15 स्त्रियांना कोरोना विषाणूने प्राण गमवावे लागले. राज्य शासनाने गुरुवारपासून कडक लॉकडाऊन लागू केले आहे.तसेच जिल्हाबंदीदेखील लागू केली आहे.
शहरात गुरुवारी 290 रुग्णांची नोंद तर 24 रुग्णांचा मृत्यू
सोलापूर शहरात महानगरपालिका प्रशासन विविध स्तरावर उपाययोजना राबवत आहे. शहरात गुरुवारी 290 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये 188 पुरुष व 102 स्त्रियांना कोरोनाची लागण झाली आहे. तर उपचार घेत असताना 15 स्त्रिया आणि 9 पुरुष, असे एकूण 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर शहरासोबतच जिल्ह्यातील विविध तालुक्यात कोरोना विषाणूचे थैमान सुरूच आहे. गुरुवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1,178 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात 719 पुरुष तर 459 स्त्रियांचा समावेश आहे. तसेच 19 रुग्णांचा मृत्यू झाला. यात झालेल्यामध्ये 12 पुरुष व 7 स्त्रियांचा समावेश आहे. माळशिरस, बार्शी आणि मोहोळ तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.