ETV Bharat / state

सोलापुरात कोरोनाचा उद्रेक सुरूच; शहर आणि ग्रामीण भागात 1449 रुग्णांची नोंद - सोलापूर कोरोना अपडेट 21 एप्रिल 2021

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन एकीकडे आटोकाट प्रयत्न करत आहे. आजही अनेक नागरिकांना याचे गांभीर्यच नाही.

Solapur corona news
सोलापूर कोरोना बातमी
author img

By

Published : Apr 22, 2021, 12:55 AM IST

सोलापूर - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बुधवारी सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात 1449 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच शहर आणि जिल्ह्यात एकूण 40 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन एकीकडे आटोकाट प्रयत्न करत आहे. आजही अनेक नागरिकांना याचे गांभीर्यच नाही. कारण लॉकडाऊन करूनदेखील शहरात आणि ग्रामीण भागात रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार याकडे आरोग्य प्रशासन आणि पोलीस प्रशासन याची वाट पाहू लागले आहेत.

सोलापूर ग्रामीणमध्ये 18 तर शहरात 22 अशा एकूण 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवाल आज आले आहेत. सध्या सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 11,494 आहे.

ग्रामीण भागात 1,111 रुग्ण -

सोलापुरात बुधवारी आरोग्य प्रशासनाने 10,593 चाचण्या घेतल्या. त्यामध्ये 1,111 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज ग्रामीण भागात 911 रुग्ण बरे झाले आहेत. तर 18 रुग्ण उपचार घेत असताना मृत्यू झाले आहेत. ग्रामीण भागातील विविध रुग्णालयात 7,937 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरात 338 रुग्णांची नोंद -

सोलापूर शहरात बुधवारी आरोग्य प्रशासनाच्या वतीने 2535 जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 338 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मृतांचा आकडा पाहिला असता 22 जणांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला आहे. शहरात आज कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेले 332 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शहरात आज देखील 3557 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.