ETV Bharat / state

'उज्ज्वला गॅस योजने'अंतर्गत १०० महिलांना गॅस किटचे वाटप

'उज्ज्वला गॅस योजने'अंतर्गत सोलापूर शहरातील महिलांना मोफत 'गॅस कनेक्शन किट'चे वाटप करण्यात आले. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. कचरा व्यवस्थापन, एलईडी, उर्वरित रस्ते या मूलभूत सुविधा देखील पुढच्या टप्प्यात दिल्या जातील असे सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.

author img

By

Published : Jul 27, 2019, 11:02 AM IST

100 women got free gas connection kits through ujjwala yojana in solapur

सोलापूर - चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांना धुराचा त्रास होऊ नये यासाठी केद्र सरकारने 'उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सोलापूर शहरातील महिलांना मोफत 'गॅस कनेक्शन किट'चे वाटप करण्यात आले. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील, प्रभाग १९ मधील आकाशवाणी केंद्र, नीलमनगर परिसरातील १०० महिलांनी याचा लाभ घेतला.

यावेळी नगरसेविका अनिता कोंडी, नगरसेविक श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरुड, डॉ. शिवराज सरतापे, भाजप पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

भाजप सरकार गरीब आणि सामान्य कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. सामान्यांना आजारांवर उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी 'आयुष्यमान भारत' योजना चालू केली आहे, गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचा संकल्प आहे. त्यामुळे, प्रत्येकाला हक्काचे घर मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून येत्या काळात गृहनिर्माण संस्थांची उभारणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कचरा व्यवस्थापन, एलईडी, उर्वरित रस्ते या मूलभूत सुविधा देखील पुढच्या टप्प्यात दिल्या जातील. असे सांगत, ज्यांचे नाव मतदार यादीत नाही त्यांनी मतदार नोंदणी करुन घेण्याचे तसेच भाजपाचे सदस्य होण्याचे देखील सुभाष देशमुख यांनी सर्वांना आवाहन केले.

Intro:mh_sol_01_gas_kit_disturbation_7201168
सुभाष देशमुखांच्या हस्ते १०० महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप
सोलापूर-
चूलीवर स्वंयपाक करणाऱ्या महिलांना धूराचा त्रास होऊ नये यासाठी सुरू करण्यात आलेल्या उज्वला गॅस योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील 100 महिलांना गॅस कनेक्शन कीटचे वाटप करण्यात आले. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमूख यांच्या हस्ते कीट वाटप करण्यात आले.
Body:दक्षिण सोलापूर मतदारसंघातील प्रभाग १९ मधील आकाशवाणी केंद्र, नीलमनगर परिसरातील गरीब महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शनच्या किटचे वाटप सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. १०० महिलांनी याचा लाभ घेतला. यावेळी नगरसेविका अनिता कोंडी नगरसेविक श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरुड, डॉ. शिवराज सरतापे, भाजप पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भाजप सरकार गरीब, सामान्य कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. सामान्यांना आजारांवर उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी आयुष्यमान भारत योजना चालू केली आहे गरजूंनी त्याचा लाभ घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचा संकल्प असल्यामुळे प्रत्येकांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून येत्या काळात गृहनिर्माण संस्थांची उभारणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कचरा व्यवस्थापन, एलईडी, उर्वरित रस्ते या मूलभूत सुविधा देखील पुढच्या टप्प्यात दिल्या जातील. ज्यांचे नाव मतदार यादीत नाही त्यांनी मतदार नोंदणी करून घ्यावी आणि भाजपाचे सदस्य होण्यासाठी सर्वांना आवाहन सुभाष देशमुख यांनी केले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.