सिंधुदुर्ग - जिल्ह्याच्या विकासात आणखीन एक भर पडली ती म्हणजे (२०२१)साली बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाची भर पडली आहे. हे विमानतळ अखेर सुरु झाले. (Sindhudurg Year Ender 2021) काही दिवसांपूर्वी तौक्ते जिल्ह्याला वादळाचाही मोठा फटका बसला. या वर्षात नेहमीप्रमाणे जिल्हा राजकीय घटनांनी धगधगता राहिला. (Inauguration of Chippewa Airport 2021) नारायण राणे याना केंद्रात मंत्रिपद मिळाले. मात्र, वर्षाच्या अखेर कणकवलीत शिवसैनिकांवर खुनी हल्ला झाला आणि आमदार नितेश राणे हे अडचणीत आले आहेत.
- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात चिपी विमानतळाने मनाचा तुरा रोवला : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात चिपी विमानतळाने मनाचा तुरा रोवला. (९ ऑक्टोबर २०२१)रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले आणि विमानसेवाही सुरु झाली. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर आले होते. जोरदार राजकीय फटकेबाजीमुळे हा कार्यक्रम चर्चेत आला होता.
- नारायण राणे यांनी ७ जुलै २०२१ रोजी मंत्री पदाची शपथ घेतली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली. (Union minister Narayan Rane)नारायण राणे यांना ७ जुलै २०२१ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. खातेवाटपात नारायण राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
- तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा तडाखा बसला : १७ मे २०२१ रोजी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा तडाखा बसला. यामुळे कोट्यवधीचे नुकसान जिल्ह्यात झाले. (Taukte Cyclone In Sindhudurg) एकूण ४० घरांचे नुकसान झाले तर दोन गोठे जमीनदोस्त झाले. चक्रीवादळामुळे जिल्ह्यात वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. वेंगुर्लेतील ५८ कुटुंबे, देवगड २५ आणि मालवण मधील ३५ कुटुंबाचे स्थलांतर करावे लागले होते.
- प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर खुनी हल्ला : १८ डिसेंबरला आणखीन एका खुनी हल्ल्याने सिंधुदुर्ग जिल्हा हादरला. कणकवली मध्ये शिवसेना कार्यकर्ते आणि जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे जिल्हा बँके निवडणूकीतील प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर खुनी हल्ला झाला. याप्रकरणी (Killer attack on Santosh Parab) आमदार नितेश राणे यांचे जवळचे कार्यकर्ते पुण्यातील सचिन सातपुते यांना दिल्लीतून अटक करण्यात आली. यामुळे राणेंच्या राजकीय दहशतवादाचा मुद्दा विरोधकांनी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला.
- वीस वर्षात पहिल्यांदाच एवढा मोठा पूर : १५ जून २०२१ रोजी सुरू झालेल्या पावसाने तब्बल दोन ते तीन दिवस विश्रांती घेतली नाही. यामुळे जिल्ह्याचा ४० टक्के भाग पाण्याखाली गेला. (Major flood in Sindhudurg district) शेती बागायती आणि खासगी मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या वीस वर्षात पहिल्यांदाच एवढा मोठा पूर सिंधुदुर्ग वासीयांनी अनुभवला. बांदा, मसुरे, खारेपाटण ही गावे मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेली.
- नोव्हेंबर २०२१ रोजी परशुराम आत्माराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला : कला क्षेत्रातील योगदानासाठी परशुराम आत्माराम गंगावणे यांना ९ नोव्हेंबर २०२१ रोजी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. परशुराम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील आहेत. (Padma Shri award to Parashuram Atmaram Gangavane) जवळपास ५०० वर्ष जूनी असलेली चित्रकथी ही लोककला जोपासण्याचे कार्य ते करीत आहेत. चित्रकथीच्या माध्यामातून समाजामध्ये ते जनजागृती व प्रबोधन करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. चित्रकथीचे दस्तऐवजीकरण व संशोधन करण्याच्या हेतूने परशुराम गंगावणे यांनी ‘ठाकर आदिवासी कला आंगण’ या ठाकर कलाच्या संग्रहालयाची स्थापना केलेली आहे.
- गोव्यातील तिघांना व्हेलच्या उलटीची वाहतूक करताना ताब्यात : व्हेल माशाच्या महागड्या उलटीप्रकरणी पोलिसांनी १० डिसेंबर रोजी मोठी कारवाई केली. (Expensive Ulati transport of fish) सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोव्यातील तिघांना व्हेलच्या उलटीची वाहतूक करताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल पाच कोटी रुपयांची उलटी जप्त करण्यात आली. ही कारवाई बांदा गांधी चौक येथे करण्यात आली. आतापर्यंतच्या तस्करी मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही मोठी कारवाई मानली जाते.
- नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार : वर्ष अखेरीस डिसेंबर महिना संपत असताना जिल्ह्यात जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. (Nitesh Rane arrest case) बँकेच्या आजवरच्या इतिहासात सर्वात जास्त ही निवडणूक चर्चेत आली आहे. ती आमदार नितेश राणे यांच्यामुळे जिल्हा बँकेचा एक मतदार बेपत्ता आहे तर शिवसैनिक असलेल्या संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकत आहे.
- काळा बिबट्या’ सापडला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात ‘काळा बिबट्या’ सापडल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात पट्टेरी ‘वाघा’चे दर्शनही घडले. सावंतवाडी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये एका पाळीव जनावराची केलेली शिकार खाताना वाघाचे छायाचित्र टिपले गेले. जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात दुर्मिळ प्रजातीतील ‘काळा बिबट्या’ दिसून आलाहोता. त्यानंतर आता जिल्ह्यातील जंगल क्षेत्रामध्ये ‘वाघा’चा वावर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हा जैवविविधतेने संपन्न असल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे.
- कॅस्ट्रो कोरल स्नेक साप आढळला : पश्चिम घाट जैवविविधता संपन्नतेत आणखीन एक भर पडली. वेंगुर्ला तुळस राऊळवाडा येथील महेश राऊळ यांना कॅस्ट्रो कोरल स्नेक ज्याला मराठीमध्ये पोवळा साप असे म्हटले जाते ही अतिशय दुर्मिळ सापाची प्रजाती आढळून आली. २४ नोव्हेंबरला हा साप आढळून आला आणि अभ्यासकांच्या भुवया उंचावल्या. हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून अतिशय दुर्मिळ असा आहे हा साप पाहण्यासाठी सर्पमित्र भटकत असतात किंवा हा साप दिसावा म्हणून संशोधनही केले जाते. सिंधुदुर्गमध्ये केवळ दुसऱ्यांदा या सापाची नोंद झाली असल्याचे वन्यप्राणी अभ्यासक म्हणतात.
हेही वाचा - Electrocution In Amravati : प्रवीण पोटेंच्या महाविद्यालयात विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू