ETV Bharat / state

'राणेंचे ते दिवस संपले, त्यांनी शिवसेना संपवण्याची डराव डराव करू नये'

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर त्यांचा बोलविता धनी कोण, हे आता समोर आले आहे. महाराष्ट्र द्वेष्ट्या आणि अत्यंत घाणेरड्या दृष्टीच्या अर्णब गोस्वामीने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची प्रतिमा, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा तसेच पोलिसांची प्रतिमा देखील दूषित करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

विनायक राऊत
विनायक राऊत
author img

By

Published : Nov 5, 2020, 8:47 AM IST

सिंधुदुर्ग - नारायण राणेंनी शिवसेना संपवण्याची डराव डराव करू नये असा खोचक सल्ला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना दिला आहे. शिवसेनेला विसर्जित करण्याच्या घोषणा यापूर्वी त्यांनी अनेकेवळा दिल्या होत्या.मात्र, ते त्यांना शक्य झाले नाही. शिवसेनेशी स्पर्धा करण्याचे नारायण राणे यांचे दिवस कधीच निघून गेले असल्याचे ही राऊत सांगायला विसरले नाहीत. नारायण राणे यांनी इतरांना घरी बसविण्याची स्वप्न आता बघू नये. लोकशाहीत एकमेव दुर्दैव आहे की, नारायण राणेंना स्वतःचा पक्ष एका वर्षाच्या आत बरखास्त करावा लागला याची आठवणही यानिमित्ताने त्यांनी राणेंना करून दिली.

महाराष्ट्र द्वेष्‍टे भाजपाच अर्णब गोस्वामीचा बोलविता धनी

काय म्हणाले होते नारायण राणे?

कोकणातील शिवसेनेच्या ११ आमदारांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवण्यात येतील. त्यामुळे आता ५६ आमदार घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेची संख्या कमी होईल, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. शिवसेनेचे १४५ आमदार निवडून आलेले नाहीत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यामुळे तुमचे आमदार किती असे त्यांना लोक विचारतील, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती.

गोस्वामींचा बोलवता धनी कोण ते सर्वांना समजले

अर्णब गोस्वामी याचा बोलविता धनी कोण, हे आता समोर आलेले आहे. भाजपाची ही कूटनीती महाराष्ट्र द्वेष्‍टे असल्याचे आता समोर आले असल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. तर स्वतःचा पक्ष एका वर्षाच्या आत बरखास्त करण्याची वेळ ओढावलेल्या नारायण राणेंनी शिवसेनेला घरी बसवण्याचे स्वप्न बघू नयेत, असा टोला देखील नारायण राणे यांना त्यांनी लगावला. राऊत सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना प्रतिक्रिया दिली. खासदार विनायक राऊत म्हणाले, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर त्यांचा बोलविता धनी कोण, हे आता समोर आले आहे. महाराष्ट्र द्वेष्ट्या आणि अत्यंत घाणेरड्या दृष्टीच्या अर्णब गोस्वामीने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची प्रतिमा, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा तसेच पोलिसांची प्रतिमा देखील दूषित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा पाठीराखा कोण होता, हे कळत नव्हते. मात्र आता त्याला सगळे भाजपवाले त्याच्या समर्थनार्थ उतरलेले असल्याची भावना विनायक राऊत यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.