सिंधुदुर्ग - जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या 8 कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध पूर्ण झाला असून संपर्कातील सर्व व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या नवीन 8 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या 110 इतकी आहे. त्यापैकी 46 व्यक्ती या अतिजोखमीच्या संपर्कातील असून कमी जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या 64 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 21 हजार 320 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
कणकवली तालुक्यातल्या डामरे येथील कुटुंबाच्या संपर्कात एकूण 21 व्यक्ती आल्या आहेत. त्यापैकी 4 जण हे अतिजोखमीच्या संपर्कातील तर, 17 जण हे कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. धालकथी येथील रुग्णांच्या संपर्कात एकूण 26 व्यक्ती आल्या आहेत. त्यातील 2 जण अती जोखमीच्या संपर्कातील तर, 24 व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. हिवाळे येथील रुग्णाच्या संपर्कात एकूण 40 व्यक्ती आल्या आहेत. त्यापैकी 22 व्यक्ती या अतिजोखमीच्या संपर्कातील असून 18 जण कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. 23 जण नाधवडे येथील रुग्णाच्या संपर्कात आले आहेत. त्यापैकी 18 जण हे अतिजोखमीच्या व 5 जण हे कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत.
कणकवली तालुक्यातील डामरे, वैभववाडी तालुक्यातील नाधवडे व मालवण तालुक्यातील हिवाळे येथे 5 जून 2020 रोजीपर्यंत कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. डामरे कंटेन्मेंट झोनमध्ये 32 घरांचा समावेश आहे. त्यामध्ये 39 कुटुंबे असून या क्षेत्राची लोकसंख्या 123 इतकी आहे. तर, नाधवडे बाधित क्षेत्रामध्ये 130 घरातील 147 कुटुंबांमधील 518 लोकसंख्येचा समावेश आहे. हिवाळे बाधित क्षेत्रामध्ये 69 घरांमधील 81 कुटुंबातील 286 व्यक्तींची समावेश आहे. तर धालकथी येथे सापडलेले दोन्ही रुग्ण हे संस्थात्मक अलगीकरणात होते. जिल्ह्यात एकूण 21 हजार 320 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्यापैकी 505 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. गावपातळीवर 20 हजार 815 व्यक्तींना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्वांना गृह अलगीकरणात ठेवले आहे. जिल्हा रुग्णालयाने एकूण 1 हजार 368 नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी 1 हजार 150 तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यातील 16 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 1 हजार 134 अहवाल निगेटिव्ह आलेत. तर, 218 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 67 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 41 रुग्ण डेडिकेटेड कोव्हीड रुग्णालयामध्ये, 26 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 4 हजार 845 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 16 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 9 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.