ETV Bharat / state

'कुरघोडीच राजकारण नाही... महाविकास आघाडीत चांगला समन्वय' - विनायक राऊत बातमी

सेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत जाणे हा स्थानिक पातळीवरील प्रश्न आहे. त्याला वरिष्ठ नेत्यांनी गांभीर्याने घेतलेले नाही. ज्या-ज्या वेळेला गरज असते तेव्हा एक पिता म्हणून शरद पवार साहेब मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करत असतात.

vinayak-raut
खासदार विनायक राऊत
author img

By

Published : Jul 10, 2020, 12:05 PM IST

सिंधुदुर्ग- राज्यात सरकार चालवत असताना महाविकास आघाडीत कुठल्याही प्रकारची नाराजी, किंवा कुरघोडीच राजकारण नाही. आघाडीत चांगला समन्वय असल्याची माहिती शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी दिली. ते कुडाळ येथे बोलत होते.

खासदार विनायक राऊत

सेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत जाणे हा स्थानिक पातळीवरील प्रश्न आहे. त्याला वरिष्ठ नेत्यानी गांभीर्याने घेतलेले नाही. ज्या-ज्या वेळेला गरज असते तेव्हा एक पिता म्हणून शरद पवार साहेब मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यातून चागंली चर्चा होत, असेही राऊत यांनी सांगितले. कुडाळ येथील महिला आणि बाल रुग्णालयाची पाहणी राऊत यांनी केली यावेळी ते बोलत होते.

कुडाळ येथील महिला बाल रुग्णालय चार महिन्यात सुरू होईल. रुग्णालयाच्या विद्युतीकरणाचे काम दीड महिन्यात पूर्ण होईल. तर उर्वरीत कामे देखील लवकरात-लवकर पूर्ण करण्याचे निर्देश बांधकाम अभियंत्यांना दिले असल्याची माहिती राऊत यांनी दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जि.प.सदस्य अमरसेन सावंत आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.