ETV Bharat / state

Hridaynath Mangeshkar : हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीवर कधी नोकरीलाच नव्हते : निवृत्त अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण - Swanatraveer Vinayak Damodhar Sawarkar

लता दीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांचे राष्ट्रभक्तीवरील गाणे आकाशवाणीवर लावल्यामुळे त्यांना नोकरीवरुन काढण्यात आले होते. यासह अनेकांना काॅंग्रेसने त्रास दिला, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत केला होता. मात्र हृदयनाथ हे कधी आकाशवाणीवर नोकरीलाच नव्हते (Hridaynath Mangeshkar never Worked on AIR ), अशी माहिती आकाशवाणीचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ. महेश केळुसकर ( Ex Officer AIR Mahesh Keluskar ) यांनी दिली.

डॉ. महेश केळुसकर
डॉ. महेश केळुसकर
author img

By

Published : Feb 10, 2022, 3:09 PM IST

सिंधुदुर्ग - हृदयनाथ मंगेशकर यांचे सर्विस रेकॉर्ड आकाशवाणीकडे नाही (Hridaynath Mangeshkar never Worked on AIR ). शिवाय त्यांनी रेकॉर्ड केलेले 'ने मजसी ने परत मातृभूमीला', हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गीत आकाशवाणीने फेमस केले. शिवाय हजारो वेळा हे गीत आकाशवाणीवर वाजवले गेले असल्याची माहिती मुंबई आकाशवाणीचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ. महेश केळुसकर यांनी दिली ( Ex Officer AIR Mahesh Keluskar ) आहे.

हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीवर कधी नोकरीलाच नव्हते : निवृत्त अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण

आकाशवाणीने गीत लोकप्रिय केले

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ( Swanatraveer Vinayak Damodhar Sawarkar ) यांची गाणी केली म्हणून हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीमधून काढून टाकण्यात आलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत म्हणाले. मात्र हृदयनाथ आकाशवाणीत कधीच नोकरीला नव्हते असा खुलासा आकाशवाणीचे सेवानिवृत्त अधिकारी, ज्येष्ठ कवी महेश केळुसकर यांनी केला आहे. केळुसकर यांनी जवळजवळ साडे छत्तीस वर्षे तिथे सेवा केली आहे. इतकंच नाही तर 'ने मजसी ने परत मातृभूमीला', हे गीत आकाशवाणीनेच लोकप्रिय केल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुरावे सादर करून म्हणणे मांडावे

यावेळी पुढे बोलताना डॉ महेश केळुसकर म्हणाले की, जवळजवळ साडे छत्तीस वर्षे मी आकाशवाणीच्या वेगवेगळ्या केंद्रांवर अधिकारी म्हणून काम केलं. या काळात मला जुन्या लोकांपैकी कोणीही पंडित ह्रदयनाथ मंगेशकर हे आकाशवाणी केंद्रावर कामाला असल्याचे सांगितले नाही. आकाशवाणीच्या नोकरीत भरती होण्याची एक सरकारी प्रक्रिया असते. या प्रक्रियेतून भरती झालेल्या एखाद्या कर्मचार्‍याला काढायचे असल्यास तेदेखील तडकाफडकी काढता येत नाही. त्याची ही एक प्रक्रिया असते. त्यामुळे हे जे काही म्हणत आहेत त्याबाबत त्यांनी योग्य ते पुरावे सादर करून आपले म्हणणे मांडले पाहिजे, अशी माझी विनंती आहे असेही डॉ महेश केळुसकर म्हणाले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.