ETV Bharat / state

सिंधुदुर्गात वातावरण तापले, भाजपच्या बॅनरला शिवसेनेकडून बॅनरनेच उत्तर - shivsena

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता बॅनर वॉर रंगू लागले आहे. देवगड येथे काल लावलेला बॅनर "ते असतानाही नाही, संपवू शकले, ते आता काय संपवणार" "'दादा'गिरी" या मथळ्याखाली बॅनर लागल्यानंतर शिवसेनेकडूनही त्याला कणकवलीत चोख प्रत्युत्तर दिले गेले आहे.

Shiv Sena banner
Shiv Sena banner
author img

By

Published : Aug 29, 2021, 10:05 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यामध्ये सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दौरा अंतिम टप्यात असताना शिवसेना भाजपात बॅनर वॉर रंगू लागले आहे. देवगडमध्ये शनिवारी भाजपच्या लागलेल्या बॅनरला शिवसेनेने कणकवलीत बॅनरने उत्तर दिले आहे. यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सिंधुदुर्गात वातावरण तापले
सिंधुदुर्गात वातावरण तापले

देवगडमध्ये झळकला भाजपचा बॅनर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता बॅनर वॉर रंगू लागले आहे. देवगड येथे काल लावलेला बॅनर "ते असतानाही नाही, संपवू शकले, ते आता काय संपवणार" "'दादा'गिरी" या मथळ्याखाली बॅनर लागल्यानंतर शिवसेनेकडूनही त्याला कणकवलीत चोख प्रत्युत्तर दिले गेले आहे. "ते राज्यात मंत्री असताना कोकणात पराभूत केले. ते केंद्रात मंत्री होऊन काय फरक पडणार" अशा आशयाचा बॅनर कणकवलीत शिवसेना जुन्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ लावण्यात आला आहे. हा बॅनर सध्या कणकवलीत चर्चेचा विषय बनला आहे.

सिंधुदुर्गात वातावरण तापले
बॅमरवॉर
कणकवलीत शिवसेनेचे बॅनरने उत्तर या बॅनरच्या वरील बाजूला स्वर्गीय बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे 19 ऑक्टोबर 2014 रोजी "जायंट किलर" असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरवर निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांना कार्यकर्त्यांनी विजयोत्सवात उचलून घेतानाच्याही फोटोचा ही समावेश आहे. तर बॅनरच्या एका बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद देतानाचा फोटो आहे. त्यामुळे देवगड येथे लागलेल्या "त्या" बॅनरला बॅनरनेच शिवसेनेकडून कणकवलीत उत्तर दिल्याचे बोलले जात आहे. हा बॅनर सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात अंतिम टप्प्यात असतानाच कणकवली शिवसेनेच्या जुन्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ लावलेल्या बॅनर मुळे पुन्हा एकदा कणकवलीतील राजकीय वातावरण तापणार आहे.

हेही वाचा - अनिल परब यांनी ईडीने पाठवलेल्या नोटीसवर देवेंद्र फडणविसांची प्रतिक्रिया, म्हणाले....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.