सिंधुदुर्ग - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कामगार आपल्या गावी परत येऊ लागले आहेत. या परिस्थितीत जिल्ह्याच्या विविध भागात चिरे खाणीचे काम करणाऱ्या कामगारांच्या जेवणाची नाश्ता आणि भोजनाची सोय येथील तहसीलदार रमेश पवार यांनी केली आहे.
मध्यप्रदेशच्या दिशेने चालत जाणाऱ्या चिरेखाण कामगारांची कणकवली तहसीलदार रमेश पवार यांना माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी तत्काळ सूत्रे हलवत या कामगारांना कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात आणले. त्यांच्या नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली. सध्या काहीच काम नसल्यामुळे हातावर पोट असलेले अनेक कामगार मिळेल त्या वाहनाने आणि जमल्यास पाणी आपल्या गावी निघाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही अनेक कामगार आपल्या घरच्या ओढीने तहान, भूक विसरून निघाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या जेवणाची सोय झाल्यामुळे काही प्रमाणात त्यांना आधार मिळाला आहे.
हेही वाचा - रक्त आटवून पिकवलेला भाजीपाला संचारबंदीमुळे शेतात सडला; संतप्त शेतकऱ्याने पिकात सोडली जनावरे