ETV Bharat / state

Criticism of Narayan Rane : माझे दोन बारके बारके भाचे म्हणत सुषमा अंधारेंनी राणे पुत्रांची उडविली खिल्ली - Criticism of Narayan Rane

ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची कणकवलीत श्रीधर नाईक चौकात सभा झाली. राणेंच्या होमपीचवर नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर टीका केली. सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंचे नाव घेताच उपस्थितांनी कोंबडी चोर म्हणून ओरड करायला सुरवात केली.

Sushma Andhare
सुषमा अंधारे
author img

By

Published : Nov 22, 2022, 10:50 AM IST

सिंधुदुर्ग : महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्गात आलेल्या ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे ( Thackeray Shiv Sena Deputy Leader Sushma Andhare ) यांनी कणकवलीत राणेंच्या होमपीचवर नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर टीका (Criticism of Narayan Rane and his two sons ) केली. सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंचे नाव घेताच उपस्थितांनी कोंबडी चोर म्हणून ओरड करायला सुरवात केली. यानंतर अंधारे यांनी माझे दोन बारके बारके भाचे म्हणत आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचाही समाचार घेतला.

अंधारे यांनी पोलीस खात्याचाही समाचार घेतला : यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी नारायण राणे नितेश राणे यांच्या वक्तव्याच्या स्लाईड दाखवत त्यांची काँग्रेस, स्वाभिमान संघटना, आणि आता भाजपामधील वक्तव्य कशी बदलत गेली हेच लोकांसमोर दाखवले. अंधारे यांनी प्रोजेक्टरवर नितेश राणे यांचे सावरकरांबद्दल चे जुने ट्विट दाखवत त्यांच्या इंग्रजी लेखनाचा अनुवाद लोकांसमोर मांडला. सावरकर यांनी ब्रिटिशांसमोर चार वेळा माफी मागितली असा माणूस युवकांचे प्रेरणास्थान होऊ शकत नाही. हे ट्विट करणारे आपले बालके लेकरू नितेश राणे आहे. असे सांगतानाच हे ट्विट राणेंच्या पोराने केले आहे आणि पोरांचाच बाप आम्हाला शहाणपण शिकवतोय. हे लोकांना आम्ही सांगायला लागलो तर डिपार्टमेंट वाला कॅमेरा घेऊन आमच्यावरच, असे विधान करत अंधारे यांनी पोलीस खात्याचाही समाचार घेतला. सावरकरांबद्दल भाजपाला एवढेच प्रेम होते तर आतापर्यंत भाजपाने त्यांना भारतरत्न का जाहीर केलं नाही असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सुषमा अंधारे

बाप समजदार असेल तर पोरं समजदार होतील : जी जी जागा चांगली दिसली त्या ठिकाणी सातबारा माझा झाला पाहिजे. नाही झाला तर माझ्या करायला आणि खोट्या केसेस टाकायला आम्ही तयार आहोत. असे म्हणत त्याने राणेंवर निशाणा साधला. अन त्यांच्या लेकरांना काय समजावून सांगावे कारण बाप समजदार असेल तर पोरं समजदार होतील, असे म्हणत प्राण्यांच्या मुलांवरही अंधारे यांनी निशाणा साधला. यावेळी त्यांनी विधानसभेतील फडणवीस यांचा बद्दलचा वक्तव्याचा व्हिडिओ जनतेसमोर सादर केला.

नव्या राजनीतीने भाजपच्या गटात देखील संभ्रमाचे वातावरण : अंधारे यांची ही सभा कणकवलीमध्ये प्राण्यांच्या बालेकिल्ल्यात होणार असल्याने राजकीय वातावरण अधिक तापलेले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्वच नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात मनाई आदेश देखील लागू करण्यात आला होता. यामुळे बोलण्याला मर्यादा येणार हे ओळखून अंधारे यांनी स्वतः टीका करणे टाळत विविध व्हिडिओ आणि ट्विट च्या माध्यमातून राणा आणि त्यांच्या मुलांना लक्ष केले. अंधारे यांच्या या प्राण्यांच्या होमपेज मधील नव्या राजनीतीने भाजपच्या गटात देखील संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना युवा नेते संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.