ETV Bharat / state

राणे विरुद्ध शिवसेना! राणेंच्या निलरत्न बंगल्याच्या बांधकामाचा अहवाल सादर करा, MCZMAची मालवण पालिकेला सूचना - केंद्रीय मंत्री नारायण राणे

मालवण येथील निलरत्न बंगल्याच्या बांधकामाचा ( Narayan Rane Sindhudurg Bungalow ) अहवाल सादर करण्याच्या महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन क्षेत्र प्राधिकरणाने (MCZMA) मालवण नगरपालिकेला सूचना दिल्या आहेत. निलरत्न बंगला केंद्रीय मंत्री नारायण राणें यांचा आहे.

Bungalow
निलरत्न
author img

By

Published : Feb 24, 2022, 7:23 AM IST

Updated : Mar 15, 2022, 4:43 PM IST

सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मालवण येथील निलरत्न बंगल्याच्या बांधकामाचा ( Narayan Rane Sindhudurg Bungalow ) अहवाल सादर करण्याच्या महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन क्षेत्र प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) मालवण नगरपालिकेला सूचना दिल्या आहेत. बांधकाम करताना संमती घेतली होती का? अनाधिकृत बांधकाम झालंय का? याची एमसीझेडएमएने माहिती मागविली आहे. मालवण नगरपालिका याबाबत अहवाल पाठवून देणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. निलरत्न बंगल्याबाबत राणेंना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मालवण नगरपालिका बांधकाम विभागाच्या अधिकृत सूत्रांनी ही माहीती दिली आहे. दरम्यान या बंगल्याबाबत आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे राणेंनी सांगितले आहे.

राणेंचा निलरत्न बंगला
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील निलरत्न या बंगल्यावर भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला कारवाईचे आदेश दिले आहेत. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, मुख्यमंत्री आणि मातोश्रीवर टीका केली होती. या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी पेटणार का अशी चर्चा सध्या सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने नारायण राणे यांच्या मालवण येथील निलरत्न बंगला बांधताना सीआरझेड 2 चे उल्लंघन झाले अशी तक्रार ऑगस्ट 2021 ला केली होती. त्यानंतर तक्रारीची कॉपी आपल्याला मिळाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिली आहे. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राणेंच्या मालवण येथील निलरत्न बंगल्याच्या बांधकामाचा अहवाल सादर करण्याच्या महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन क्षेत्र प्राधिकरणने (एमसीझेडएमए)मालवण नगरपालिकेला सूचना दिल्या आहेत. बांधकाम करताना संमती घेतली होती का? अनाधिकृत बांधकाम झालंय का? याची एमसीझेडएमएने माहिती मागविली आहे. दरम्यान या बंगल्याच्या पाहाणीबाबत आपल्याला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असे राणे सिंधुदुर्गात बोलताना म्हणाले. राणेंचा बंगला तोडण्याची हिंमत कोणात नाही. आता ते तक्रारी करत आहेत. माझं काही बेकायदेशीर नाही. मी सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत. मुंबईच्या बंगल्याला सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच मी 2013 सालात त्या ठिकाणी राहायला गेलो आहे. मालवणचे घर देखील सर्व परवानगी घेऊनच बांधलेला आहे. या घराबाबत कोणतीही नोटीस आम्हाला अद्यापही मिळालेले नाही. तरीदेखील ज्या वृत्तपत्राने आणि वृत्तवाहिन्यांनी या घराच्या बाबतीत बातम्या दाखवल्यात त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार. कोणालाही सोडणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. पत्रकारांनी जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये प्रामाणिक पत्रकारिता करावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Last Updated : Mar 15, 2022, 4:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.