ETV Bharat / state

सिंधुदुर्गमध्ये संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीला सुरूवात; जिल्ह्याच्या सीमांवर आरोग्य पथके तैनात

जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशनवर आरोग्य पथकांकडून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहेत. एसटी विभागाने आपली सेवा मर्यादित प्रमाणात सुरू ठेवली आहे. बाजारपेठांमध्ये भाजीवाले, फळ विक्रेते, किराणा दुकान, बेकरी व्यवसाय सुरू ठेवण्यात आलेले आहेत. मात्र, बाजारपेठांमध्ये संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असल्यामुळे ग्राहकांचा अभावा दिसत आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संचारबंदी अंमलबजावणी
संचारबंदी अंमलबजावणी
author img

By

Published : Apr 15, 2021, 3:11 PM IST

Updated : Apr 15, 2021, 3:49 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जाहीर झालेल्या पंधरा दिवसाच्या संचारबंदीला अनुसरून जिल्ह्यात याची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी यांनी जिल्हावासीयांना संचारबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आले आहेत. तसेच रेल्वे स्टेशनवर देखील येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. संचारबंदी ची कडक अंमलबजावणी केली असल्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये फारशी गर्दी दिसेनाशी झाली आहे.

आरोग्य पथके तैनात
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशनवर आरोग्य पथकांकडून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहेत. एसटी विभागाने आपली सेवा मर्यादित प्रमाणात सुरू ठेवली आहे. बाजारपेठांमध्ये भाजीवाले, फळ विक्रेते, किराणा दुकान, बेकरी व्यवसाय सुरू ठेवण्यात आलेले आहेत. मात्र, बाजारपेठांमध्ये संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असल्यामुळे ग्राहकांचा अभावा दिसत आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सिंधुदुर्गमध्ये संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीला सुरूवात
एसटी बसने ग्रामीण भागातील फेऱ्या केल्या रद्दजिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जात असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये एसटी वाहतुकीला गेले काही दिवस चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. तसे बोर्ड देखील एस टी डेपो मध्ये लावण्यात आले आहेत. काही लांब पल्ल्याच्या फेऱ्या वगळल्या तर एसटीने आपली वाहतूक मर्यादित स्वरुपात चालू ठेवली आहे. यामुळे ग्रामीण भागात कोणत्याही कामानिमित्त जायचे झाल्यास किंवा गावातून शहरात यायचे झाल्यास खासगी सेवेवर प्रवाशांना अवलंबून राहावे लागत आहे.मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे स्टेशन मध्ये होते तपासणीमुंबईतून येणार्‍या चाकरमान्यांची तपासणी करण्यासाठी रेल्वे स्टेशनमध्ये आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात आले आहेत. ऑक्सिमीटर तपासणी आणि थर्मल स्कॅनिंग करून येणाऱ्या प्रवाशांचा डेटा नोंदविला जात आहे. ज्या प्रवाशांना कोविड सदृश लक्षणे आहेत, त्या प्रवाशांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपजिल्हा रुग्णालयात कोविडच्या तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. कणकवली रेल्वे स्टेशनमध्ये आरोग्य विभागाच्या पथकाबरोबर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा-अनेक संकटानंतरही उभे राहिलेले गाव!

Last Updated : Apr 15, 2021, 3:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.