ETV Bharat / state

गोपीचंद पडळकरांचा सिंधुदुर्गात निषेध; राष्ट्रवादी आक्रमक - sharad pawar news

भाजपाचे विधानपरिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विरोधात बुधवारी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच विविध स्तरांतून पडळकरांचा निषेध नोंदवण्यात येत आहे.

sindhudurg NCP
विविध स्तरांतून पडळकरांचा निषेध नोंदवण्यात येत आहे.
author img

By

Published : Jun 25, 2020, 5:06 PM IST

सिंधुदुर्ग - भाजपाचे विधानपरिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विरोधात बुधवारी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच विविध स्तरांतून पडळकरांचा निषेध नोंदवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला मारण्यात आल्या.

विविध स्तरांतून पडळकरांचा निषेध नोंदवण्यात येत आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये संताप असून पडळकरांनी माफी मागावी, असा पवित्रा उपस्थितांनी घेतला. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

बुधवारी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचे वक्तव्य केले. यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. विविध नेत्यांनी त्याचा निषेध व्यक्त केला. भाजपाने देखील हात झटकल्यानंतर पडळकरांना सर्वत्र निषेधाला सामोरे जावे लागले. आज राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादीने पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.