ETV Bharat / state

Sindhudurg Flood : दिगवळेत दरड कोसळून महिलेचा मृत्यू, एक जखमी; खारेपाटण शुकनदीने ओलांडली धोक्याची पातळी - दिगवळे दरड कोसळली

कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याला असलेल्या दिगवळे येथे दरड घरावर कोसळली. यात झोपलेल्या महिलेचा दरडीखाली चिरडून मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, खारेपाटण शुकनदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जैनवाडी येथील सुमारे १० ते १५ घरे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत.

Sindhudurg
Sindhudurg
author img

By

Published : Jul 23, 2021, 7:34 PM IST

सिंधुदुर्ग - कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याला असलेल्या दिगवळे गावातील रांजणवाडीत पहाटे हाहाकार झाला. साखर झोपेत असतानाच घाडे कुटुंबावर काळाने घाला घातला. घराशेजारील दरड घरावर कोसळली. यात झोपलेल्या महिलेचा दरडीखाली चिरडून मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. गुरूवारपासून (22 जुलै) सुरू असलेला पाऊस अद्यापही थांबलेला नाही.

दिगवळेत दरड कोसळून महिलेचा मृत्यू

घरावर दरड कोसळल्याने महिलेचा मृत्यू

घरावर दरड कोसळल्याने महिलेचा मृत्यू
घरावर दरड कोसळल्याने महिलेचा मृत्यू

कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरून पडझडसुद्धा झालेली आहे. तर आज पहाटे तालुक्यातील दिगवळे रांजणवाडी येथील घाडे यांच्या घरावर दरड कोसळल्याने त्या घरातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक पुरुष जखमी देखील झाल्याची घटना समोर आली आहे. या घरातील इतर दोघे सुदैवाने बचावले असून जखमीवर नाटळ येथे उपचार सुरू आहेत.

शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली

खारेपाटण शुकनदीने ओलांडली धोक्याची पातळी

दुसरीकडे, खारेपाटण शुकनदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खारेपाटणसह शुकनदीकिनारी असलेल्या गावांना पुराचा फटका बसला आहे. गावातील जैनवाडी येथील सुमारे १० ते १५ घरे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. खारेपाटण ग्रामपंचायत सरपंच राऊत, नायब तहसीलदार राठोड, मंडळ अधिकारी यादव, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी आलेले आपत्तीनिवारक पथक यांच्यासह पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे.

जैनवाडीत पूर
जैनवाडीत पूर

खारेपाटण ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद

खारेपाटण पुराच्या पाण्याने शुकनदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरील ९.५ मिटर उंचीची पातळी गाठली होती. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी व पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण येथे सुमारे दीड किलोमीटरपर्यंत अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

हेही वाचा - Landslide History : आतापर्यंतच्या भूस्खलनाच्या घटना, जवळपास 7000 हून अधिक मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.