ETV Bharat / state

'त्या' हत्तीला पकडण्यासाठी मोहीम राबवायची की नाही? यासाठी वनविभागच घेतंय सह्यांची मोहीम - सह्यांची मोहीम

तिलारी खोऱ्यातील आयनोडे हेवाळे, घाटीवडे, बांबर्डे, केर भेकुर्ली, मोर्ले, सोनावल आदी गावात हत्तींचा वावर आहे. पाच ते सहा हत्तींचा कळप तिलारी परिसरात असला तरी एक टस्कर एकटाच फिरतो. त्याने आजूबाजूची अनेक गावे पादाक्रांत केली आहेत.

taskar elephant
या हत्तीला पकडण्यासाठी सह्यांची मोहीम
author img

By

Published : Jul 9, 2020, 1:07 PM IST

Updated : Jul 9, 2020, 1:18 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्ती पकड मोहीम राबवावी की नको, याबाबत हत्तीबाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांची मते आजमावण्याचे काम वनविभागाने सुरू केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या सह्या घेण्याची मोहीम कोनाळ वनविभागाच्यावतीने सुरू झाली आहे.

या हत्तीला पकडण्यासाठी सह्यांची मोहीम

तिलारी खोऱ्यातील आयनोडे हेवाळे, घाटीवडे, बांबर्डे, केर भेकुर्ली, मोर्ले, सोनावल आदी गावात हत्तींचा वावर आहे. पाच ते सहा हत्तींचा कळप तिलारी परिसरात असला तरी एक टस्कर एकटाच फिरतो. त्याने आजूबाजूची अनेक गावे पादाक्रांत केली आहेत. शिवाय तो निर्धास्तपणे मानवी वस्तीकडे येतो. मोर्लेत तो मंदिराजवळ आला होता. अनेकांच्या अंगणातही त्याने धडक दिली आहे. सगळ्या गावकऱ्यांवर त्याची दहशत आहे. त्याचा अगडबंब देह, त्याचा थेट चाल करुन येण्याचा स्वभाव यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरते. त्याला वस्तीत येण्यापासून रोखावा आणि त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडावा अशी गावकरी मागणी करत आहे.

त्यामुळे हत्तीला पकडून आंबोली नांगरतास जवळील घाटकरवाडीतील नियोजित हत्ती कॅम्पमध्ये ठेवण्याचा विचार वनविभाग करत आहे. त्याला तेथील गावकरी आणि ग्रामपंचायतीचा विरोध असला तरी हत्ती पकड मोहीम राबवण्याची पूर्वतयारी म्हणून वनविभाग सह्यांची मोहीम राबवून मत आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. हत्ती पकड मोहीम राबवावी आणि राबवू नये, अशा दोन मतांच्या आधारावर सह्या घेण्यात येत आहेत. त्यानंतर हत्ती पकड मोहीम राबवण्याबाबतचा निर्णय होणार आहे.

दोडामार्ग तालुक्‍यातील अनेक शेतकरी, जिल्ह्यातील अनेक पर्यावरणप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांना हत्तीला पकडण्याऐवजी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था राखीव क्षेत्रात करुन त्याचे संगोपन करावे. हत्ती वस्तीकडे येऊ नयेत म्हणून आवश्‍यक उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वाढवून द्यावी, पण हत्तींना तिलारी राखीव क्षेत्रातच ठेवावे असे वाटते. दरम्यान, हत्ती पकड मोहीम राबवण्याचे जर निश्‍चित झाले तर केर मोर्ले खरारीब्रीज परिसरात वावर असणाऱ्या टस्कर हत्तीला पहिल्यांदा पकडण्यात येणार आहे. त्याच्याबद्दल लोकांच्या मनात अधिक भीती असल्याकारणाने वनविभागाला त्याला प्रथम जेरबंद करावे लागेल, असे एका वनाधिकाऱ्याने सांगितले.

Last Updated : Jul 9, 2020, 1:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.