ETV Bharat / state

Chipi Airport : वन्य प्राण्यांचा धोका पाहता संरक्षक जाळ्या हव्या - राऊत - विनायक राऊत न्यूज

चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर तब्बल २५ ते ३० सोनेरी कोल्हे वावरत असतात. त्यामुळे आता यावर तोडगा कसा काढणार, हा एक नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे. चिपी विमानतळा(Chipi Airport)वरील जंगली प्राण्यांचा धोका लक्षात घेता मुख्य गेटवर तिथे सातत्याने पहारा ठेवा, तिथल्या जाळ्या व्यवस्थित बसवा, अशा सूचना एअरपोर्ट आयआरबी(IRB Infrastructure Developers Limited)ला दिल्या आहेत, असे विनायक राऊत म्हणाले.

चिपी विमानतळ
चिपी विमानतळ
author img

By

Published : Nov 27, 2021, 12:21 PM IST

सिंधुदुर्ग - चिपी विमानतळा(Chipi Airport)वर जंगली प्राण्यांचा धोका वाढत आहे. वन्य प्राण्यांचा वावर दिसून येत असल्यामुळे विमान सेवेला अडथळा निर्माण होत आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी विमानतळावरील अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्याचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले. चिपी विमानतळाच्या चारही बाजुंनी आवार भिंत आहे. या भागाने जंगली प्राणी म्हणजे कोल्हे (Fox) विमानतळावर येतात. त्यामुळे मुख्य गेटवर तिथे सातत्याने पहारा ठेवा, तिथल्या जाळ्या व्यवस्थित बसवा, अशा सूचना एअरपोर्ट आयआरबी(IRB Infrastructure Developers Limited)ला दिल्या आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

धावपट्टीवर २५ ते ३० सोनेरी कोल्ह्यांचा वावर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ सुरू झाले. विमानतळाची उभारणी करण्यासाठी मागील २० वर्षांपासून अनेक प्रकारची विघ्ने समोर आली. परंतु आता पुन्हा एकदा नवीन समस्या निर्माण झाली आहे. कारण चिपी विमानतळावर विमाने धावण्याऐवजी कोल्ह्यांची धावपळ सुरू आहे. विमानतळाच्या धावपट्टीवर तब्बल २५ ते ३० सोनेरी कोल्हे वावरत असतात. त्यामुळे आता यावर तोडगा कसा काढणार, हा एक नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे.

विमानांना उतरण्यास अडचणींना

स्थानिक वन विभाग आणि विमान प्राधिकरण यांना या सोनेरी कोल्ह्यांना पकडण्यासाठी परवानगीची गरज आहे. त्यांना पकडल्यानंतर इतर जागी हलवण्याची आवश्यकता आहे. परंतु विमानतळाच्या परिसरात जवळपास २५ ते ३० कोल्ह्यांचा वावर सुरू असून मुंबईवरून सिंधुदुर्गाकडे येणाऱ्या विमानांना उतरण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबईहून सिंधुदुर्ग या मार्गावर विमानाच्या दररोज तीन फेऱ्या होत असतात. परंतु कोल्ह्यांच्या सिंधुदुर्ग विमानतळावरील धावपट्टीमुळे वैमानिकांना विमान उतरवण्यास मोठा त्रासदेखील होत आहे.

कोल्ह्याची शिकार, व्यापार हा दंडनीय गुन्हा

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानतळाच्या २७५ एकर भूभागाजवळ एक संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. तसेच विमानतळाभोवती एका मोठे गवतदेखील उभे राहिले आहे. त्यामुळे कोल्ह्यांचा अधिकप्रमाणे वावर वाढत असल्याचे सांगितले जात आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची दोन अंतर्गत कोल्ह्यांना संरक्षण देण्यात आले आहे. हे कोल्हे सर्व प्रकारची फळे, पक्षी, कीटक, मासे आणि लहान प्रकारचे सस्तन प्राणी खातात. तसेच कोल्ह्याची शिकार करणे किंवा त्यांचा व्यापार करणे, हा दंडनीय गुन्हा आहे.

पहारा देण्याच्या सूचना

खासदार विनायक राऊत यांनी विमानतळ कंपनी असलेल्या आयआरबीला या ठिकाणी कडेकोट पाहारा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. विमानतळावर विमान लँडिंग होताना कोणताही अपघात घडू नये, याबाबतची काळजी विमानतळ प्रशासनाने घ्यावी, असेही खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.