ETV Bharat / state

सिंधुदुर्गची कन्या पूर्वा सावंत ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात भारतात दुसरी - पूर्वा सावंत ट्रिपल जंप न्यूज

पूर्वा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भडगाव गावचे उद्योजक हितेश सावंत यांची मुलगी आहे. कोरोना महामारीमुळे १८ वर्षीय पूर्वाला २० वर्षीय गटात खेळावे लागले. कोरोनाकाळात सराव नसतानाही जिद्दीच्या जोरावर तिने हे यश खेचून आणले आहे.

पूर्वा सावंत
पूर्वा सावंत
author img

By

Published : Feb 10, 2021, 8:23 AM IST

सिंधुदुर्ग - ३६व्या ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात सिंधुदुर्गची कन्या पूर्वा हितेश सावंतने रौप्यपदक जिंकले आहे. आसामच्या गुवाहाटी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत तिने दमदार कामगिरी करून देशात दुसरा क्रमांक पटकावला. अ‌ॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाकडून (AFI) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पूर्वा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भडगाव गावचे उद्योजक हितेश सावंत यांची मुलगी आहे. कोरोना महामारीमुळे १८ वर्षीय पूर्वाला २० वर्षीय गटात खेळावे लागले. कोरोनाकाळात सराव नसतानाही जिद्दीच्या जोरावर तिने हे यश खेचून आणले आहे.

१२.२४ मीटर जंप घेत सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी

महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना रौप्यपदक पटकाविल्याने तिने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्जवल केले आहे. १२.२४ मीटर जंप घेत तिने उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी नोंदवली. पूर्वाला प्रशिक्षक वीरेंद्र यादव यांचे प्रशिक्षण लाभले. तर, कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक, इंडियन ऑलम्पिक असोशिएशनचे उपाध्यक्ष नामदेव शिरगावकर, माजी ऑलिम्पिकपटू आनंद मेनेझिस आणि आई वडील यांचे तिला मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा - भारताच्या माजी 'वजनदार' खेळाडूकडे मुंबई संघाचे प्रशिक्षकपद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.