ETV Bharat / state

'सिंधुदुर्ग'साठी आनंदाची बातमी..! कोरोनाच्या लसीकरणाचा आराखडा तयार

गेले वर्षभर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. अनेक लोकांचे त्यामध्ये बळी गेले. कोरोना नियंत्रणासाठी दिवस-रात्र सर्व प्रशासकीय यंत्रणा राबत असून कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. डिसेंबर २०२० अखेर कोरोना प्रतिबंधक लस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस देण्याची पूर्वतयारी सिंधुदुर्गात सुरू आहे. असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

author img

By

Published : Dec 20, 2020, 1:48 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कुणाकुणाला लस द्यायची, याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेशी निगडीत असणाऱ्या साडेसात हजार लोकांना ही कोरोना प्रतिबंधक लस देण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. यामध्ये शासकीय व खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा आणि अंगणवाडी सेविकांचा समावेश केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापर्यंत होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गेले वर्षभर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. अनेक लोकांचे त्यामध्ये बळी गेले. कोरोना नियंत्रणासाठी दिवस-रात्र सर्व प्रशासकीय यंत्रणा राबत असून कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. डिसेंबर २०२० अखेर कोरोना प्रतिबंधक लस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस देण्याची पूर्वतयारी सिंधुदुर्गात सुरू आहे. असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

'सिंधुदुर्ग'साठी आनंदाची बातमी..! कोरोनाच्या लसीकरणाचा आराखडा तयार

सिंधुदुर्गात तीन टप्प्यात होणार लसीकरण -

कोरोना प्रतिबंधक लस तीन टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेशी निगडीत असणाऱ्या ७ हजार ५५६ व्यक्तींना लस दिली जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ५८ शासकीय रुग्णालयांमधील ५ हजार ४४९ जणांचा समावेश आहे. तर खासगी डॉक्टर, नर्सिंग होममधील १ हजार १०७ जणांना लस दिली जाणार आहे. शासकीय, खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनाही पहिल्या टप्प्यात ही लस दिली जाणार आहे. तसेच साडेसात हजार व्यक्तींना लस देण्यासाठी २८६ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्याची सर्व तयारी करण्यात आली असून प्रशिक्षणही देण्यात येत आहे. असे डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांनी सांगितले.

२ लाख लोकांना लसीकरण होऊ शकते एवढी साठवण क्षमता -

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर ही लस ठेवण्यासाठी पुरेशी यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली आहे. शीतसाखळी तयार करण्यात आली असून २ लाखाहून अधिक लोकांसाठी लसीकरण करता येईल एवढी लस ठेवण्याची क्षमता असणारी शीतसाखळी जिल्हय़ात सद्यस्थितीत उपलब्ध आहे. लसीकरणादरम्यान पुरेपूर दक्षता घेण्यात येणार असून कोविडच्या नियमांचे पालन होण्यासाठी जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणापर्यंत लसीकरणाची व्यवस्था केली जाणार आहे. लस देताना योग्य प्रकारे नियोजन होण्यासाठी जिल्हा परिषदेचे विविध विभाग, रोटरी क्लब, युनिसेफ, इंडियन मेडिकल असोसिएशन, महिला व बालविकास प्रकल्प या विविध विभागाकडून सहकार्य घेतले जाणार आहे

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूक्ष्म नियोजनाच्या सूचना -

डिसेंबर अखेरीस किंवा २०२१मध्ये नव्या वर्षात लस येण्याची शक्यता असल्याने ही लस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना देण्याच्या दृष्टीने सर्वप्रकारची तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापर्यंत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर तयारी केली जात आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेतल्या जात आहेत, अशी माहिती डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा - 'माझ्यासमोर जेधे, शेख, भंडारी यांचा खून करून आनंद व्यक्त केला'

हेही वाचा- गुप्तधनाच्या हव्यासापोटी कुटासामध्ये जादूटोणासारखे अघोरी कृत्य; गावात खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.