ETV Bharat / state

'जगण्यासाठी सामान्य माणूस कर्जबाजारी होतोय हे राज्य सरकारला शोभणारं नाही'..

author img

By

Published : Jun 28, 2020, 7:22 PM IST

'सर्वसामान्यांना कर्ज काढून बिलं भरनं परवडणार नाही. सोबतच जगण्यासाठी सामान्य माणूस कर्जबाजारी होतोय हे राज्य सरकारला शोभणार नाही.' असे म्हणत गरीबांची लुट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रविण दरेकरांनी केली आहे.

प्रविण दरेकर
प्रविण दरेकर

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या, त्यांच्याकडून आकरण्यात येणारी बिले, उपचार आणि सोयी सुविधांवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरकरे यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. गरीबांची लुट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोबतच सर्वसामान्यांना कर्ज काढून बिलं भरणं परवडणार नाही आणि जगण्यासाठी सामान्य माणूस कर्जबाजारी होतोय हे राज्य सरकारला शोभणार नसल्याचे मतही प्रविण दरेकरांनी व्यक्त केले आहे.

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांची पत्रकार परिषद

जिल्ह्यातील कोरोनास्थितीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले, 'जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रूग्ण वाढत असताना खासगी रुग्णालयांमध्ये रूग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, याशिवाय रूग्णांकडून अव्वाच्या-सव्वा बिले आकारली जातयेत. यावर मी स्वतः बोरीवलीमधे आंदोलन केलं होतं, गरीब व्यक्तीचं सात लाख रूपयाचं बिल त्याला परत केलं. सरकारनं या ठीकाणी भुमिका घेतली पाहीजे. केवळ पत्र पाठवून कार्यवाही होत नसते. तर सरकारनं अशा रुग्णालयांवर एफ. आय. आर. दाखल केली पाहीजे.

हेही वाचा - आम्ही अशा शिव्या देऊ की विरोधकांना झोप लागणार नाही'...

जिल्ह्यातील कोरोनाबाधांची वाढती संख्या चिंताजनक आहे असे म्हणून दरेकर पुढे म्हणाले, 'सर्वसामान्यांना कर्ज काढून बिलं भरनं परवडणार नाही. सोबतच जगण्यासाठी सामान्य माणूस कर्जबाजारी होतोय हे राज्य सरकारला शोभणार नाही. आज खासगी हाॅस्पीटलांनी बाजार मांडलेला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करत सर्व सामान्यांना न्याय दिला पाहीजे'. संक्रमण वाढत असतानाच खासगी रुग्णालयं रुग्णांची तपासणी करत नाहीत, हे चिंताजनक असल्याचेही दरेकरांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे.

हेही वाचा - पुन्हा लॉकडाऊन लागू करायचा का, याचा निर्णय जनतेलाच घ्यायचा आहे - मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.